Join us

VIDEO : मामा गोविंदाला सोडून आता पत्नीचीच खिल्ली उडवताना दिसला कृष्णा, पाया पडून केला नमस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 15:59 IST

The Kepil Sharma Show : सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना त्यांचा सिनेमा 'अंतिम'चं प्रमोशन करण्यासाठी द कपिल शर्मा शोमध्ये आले होते.

लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishekh) कॉमेडी चांगलीच पसंत केली जाते. तो शोमध्ये जेव्हा एक अॅक्ट करतो तेव्हा लोक पोट धरून हसतात. यावेळी सलमान खान (salman Khan) स्पेशल एपिसोडमध्ये कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह सुद्धा आली होती. अॅक्ट दरम्यान कृष्णाने असं काही केलं की, प्रेक्षक लोटपोट होऊन हसू लागले होते. शोमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना त्यांचा सिनेमा 'अंतिम'चं प्रमोशन करण्यासाठी द कपिल शर्मा शोमध्ये आले होते. यावेळी कृष्णा धर्मेद्रच्या गेटअपमध्ये दिसला. तो गेस्टसोबत बोलता बोलता ऑडिअन्समध्ये जातो आणि अचानक पत्नी कश्मीराच्या पाया पडतो. कृष्णाच्या या रिएक्शनमुळे कश्मीरा शॉक्ड होते. तो कश्मीराला विचारतो की, 'काही अडचण तर नाही ना? यावर कश्मीरा म्हणते, नाही. मग कृष्णा पुन्हा म्हणतो 'मग कृष्णाला का त्रास देतेस? कृष्णाचा  हा डायलॉग ऐकून एकच हशा पिकतो.

यानंतर कृष्णा कश्मीरावर जोक मारायला सुरूवात करतो. तो सलमानला म्हणतो की, मी तुमचे सगळे सिनेमे पाहिले आहेत. पण 'कही प्यार ना हो जाए' सिनेमा आवडला नाही. कारण यात कश्मीराही होती. कृष्णा म्हणतो की, मला केवळ एका कारणाने हा सिनेमा मला आवडला नाही'. यावर किकू शारदा विचारतो, 'कश्मीरामुळे का?' तर यावर कृष्णा म्हणतो, 'नाही चंकी पांडेमुळे'. मग किकू शारदा पुन्हा म्हणतो की, 'पण सिनेमात तर चंकी पांडे आहेच नाही'. तर कृष्णा म्हणतो की, 'घोंचू, तुला इशारा समजत नाही का?'.  

टॅग्स :द कपिल शर्मा शोकृष्णा अभिषेक