Join us  

चीची मामा, मी एक गोष्ट खूप मिस करतो..., गोविंदाबद्दल बोलताना कृष्णा अभिषेकला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 4:39 PM

Krushna Abhishek apologizes to Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा-भाच्यातील वाद अद्यापही संपलेला नाही. आता या संपूर्ण एपिसोडवर पुन्हा एकदा कृष्णा बोलला आहे. अर्थात बयानबाजी सोडून यावेळी त्यानं पाणावलेल्या डोळ्यांनी मामा गोविंदाची माफी मागितली आहे.

Krushna Abhishek apologizes to Govinda:  बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek)  या मामा-भाच्यातील वाद अद्यापही संपलेला नाही. या ना त्या निमित्ताने अनेकदा हा वाद उफाळून येतो. मग एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, खुलासे असं सगळं घडताना दिसतं. गतवर्षी  गोविंदा व त्याची पत्नी सुनीता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार म्हटल्यावर, कृष्णाने हा एपिसोड करण्यास स्पष्ट नकार दिला होता.  कृष्णाच्या या वागण्यानं मामी सुनीता जाम भडकली होती आणि यापुढे मला त्याचं थोबाडंही पाहायचं नाही, असं म्हणून तिनं आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. आता या संपूर्ण एपिसोडवर पुन्हा एकदा कृष्णा बोलला आहे. अर्थात बयानबाजी सोडून यावेळी त्यानं पाणावलेल्या डोळ्यांनी मामा गोविंदाची माफी मागितली आहे.

टीव्ही होस्ट व अ‍ॅक्टर मनीष पॉल याच्या ‘पॉडकास्ट’ या शोमध्ये कृष्णा हजेरी लावणार आहे.काही  तासांपूर्वी मनीषने या शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. या कृष्णा मामा गोविंदाबद्दल बोलताना दिसतोय. मामाबद्दल बोलताना कृष्णाला अश्रू अनावर झालेत. बोलता बोलता तो भावुक झाला.

‘मी मामाबद्दल बोलतो आणि दरवेळी मीडिया माझं म्हणणं कट-पेस्ट करून चुकीच्या पद्धतीनं दाखवतो. यामुळे आमच्यात गैरसमज आणखी जास्त वाढले आहेत,’असं कृष्णा म्हणतो. यावर आमचा शो पूर्ण अनकट दाखवणार, असं मनीष पॉल म्हणतो. यानंतर कृष्णा मामाबद्दल बोलू लागतो आणि बोलता बोलता भावुक होतो.

‘चीची मामा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्हाला खूप मिस करतो. मीडियात काय आलं, काय दाखवलं, यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका. मी एकच गोष्ट सर्वाधिक मिस करतो. ती म्हणजे, माझ्या बेबींसोबत मामाचं असणं. माझ्या बेबीजसोबत माझ्या मामानी खेळावं, ही एक गोष्ट मी खूप मिस करतो. मला माहित आहे, ते सुद्धा मला खूप मिस करत असतील,’असं कृष्णा म्हणतो.

टॅग्स :कृष्णा अभिषेकगोविंदामनीष पॉल