Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाफ्टर शेफच्या सेटवर सरप्राईज, कृष्णा अभिषेक अन् कश्मिरा शाह कोणाला घेऊन आले? बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:40 IST

कृष्णा आणि कश्मिरा मामी सुनिताला घेऊन आले...

बॉलिवूडचा 'चीची' म्हणजेच गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील १० वर्षांपासूनचा वाद सर्वांना माहितच आहे. काही महिन्यांपूर्वी मामा-भाच्यामधअये पुन्हा सगळं सुरळीत झालं होतं. गोविंदाला गोळी लागली तेव्हा कृष्णाची पत्नी कश्मिरा शाह रुग्णालयात भेटायला गेली होती.  मात्र या सगळ्यात गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा कुठेच दिसल्या नाहीत. सुनिता आहुजा अजूनही कृष्णावर नाराज असल्याची चर्चा झाली. दरम्यान नुकतंच सुनीता आहुजा आणि कृष्णा एकत्र दिसले.

मात्र, 'लाफ्टर शेफ' या शोच्या सेटवर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी सर्व जुने हेवेदावे विसरून कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांना प्रेमाने मिठी मारली. गेल्या अनेक वर्षांपासून मामा-भाच्याच्या नात्यात आलेली कटुता आता दूर होताना दिसत आहे. या वादात मामा गोविंदापेक्षा मामी सुनीता अधिक आक्रमक होत्या. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आरती सिंहच्या लग्नात गोविंदा हजर राहिले होते, परंतु सुनीता यांनी तिथे जाणे टाळले होते. मात्र, 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर जेव्हा सुनीता पोहोचल्या, तेव्हा त्यांनी कश्मीरा आणि कृष्णाचे मोठ्या मनाने स्वागत केले. यावेळी कश्मीरानेही आनंदाने सुनीता यांचा हात हातात घेतला आणि "आमची धुरंधर परत आली आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. हा संपूर्ण सोहळा पाहून सेटवर असलेले सर्वच जण भावूक झाले होते.

गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील या वादाची ठिणगी २०१६ मध्ये पडली होती. कश्मीरा शाह हिने "पैशांसाठी नाचणारे लोक" असे एक ट्विट केले होते, जे सुनीता यांनी स्वतःच्या कुटुंबावर आणि गोविंदावर घेतलेली वैयक्तिक टीका मानली होती. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांत अबोला होता. सुनीता यांनी तर एकदा जाहीरपणे सांगितले होते की, त्यांना कृष्णाचा चेहराही बघायचा नाही. मात्र, काळाच्या ओघात आणि कुटुंबाच्या मोठ्यांच्या पुढाकाराने ही कडू आठवण आता मागे पडली आहे.

सुनीता आहुजा यांना सेटवर पाहून फोटोग्राफर्सनी जेव्हा गोविंदाबद्दल विचारले, तेव्हा कृष्णाने मिश्किलपणे सांगितले की, जेव्हा त्यांच्या तारखा मिळतील तेव्हा तेही नक्की येतील. हा सुखद धक्का कृष्णा आणि कश्मीरासाठी अनपेक्षित होता. मामा-भाच्याच्या या घरवापसीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता लवकरच गोविंदा आणि कृष्णा पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Govinda's wife reunites Krishna Abhishek and Kashmira Shah on set.

Web Summary : Ending a long feud, Sunita Ahuja embraced Krishna Abhishek and Kashmira Shah on 'Laughter Chef'. The families reconciled after years of tension sparked by a tweet in 2016. This reconciliation brings joy to fans hoping to see Govinda and Krishna together again.
टॅग्स :कृष्णा अभिषेकटेलिव्हिजन