दो पत्ती फेम अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) बिझनेसमन कबीर बहिया(Kabir Bahiya)ला डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. एकीकडे या दोघांनीही या वृत्तावर मौन बाळगले असताना दुसरीकडे सोशल मीडियावर असे फोटो किंवा व्हिडीओ समोर येत आहेत जे पाहून ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. आता खुद्द क्रिती सनॉननेच एक फोटो पोस्ट करून या चर्चेला दुजोरा दिला आहे.
काल म्हणजेच १९ नोव्हेंबरला कबीर बहियाचा वाढदिवस होता. या खास प्रसंगी क्रितीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिचा आणि कबीरचा एक फोटो शेअर केला आहे. क्रितीचा फोटो पाहून असे दिसते की दोघेही दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहेत.
क्रितीने शेअर केलेल्या फोटोमध्ये हे कपल हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. यानंतर आता पुन्हा एकदा कबीर बहिया आणि क्रिती सनॉनच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. फोटो पोस्ट करत क्रितीने लिहिले, 'हॅपी बर्थडे के! तुझे निरागस हास्य सदैव जिवंत राहो!' तेव्हापासून त्यांचे चाहते त्यांचे नाते निश्चित मानत आहेत. या नात्याला कायमस्वरूपी समजावे, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत.
क्रिती सनॉनने दिला मोठा इशारादोघेही दुबईत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे कारण दोन दिवसांपूर्वी कबीरने त्याच लोकेशन आणि कपड्यांमधील स्वतःचे अनेक फोटो शेअर केले होते. तोच काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि सनग्लासेस घालून बीचवर दिसला होता. दुबईतील पाम जुमेराह येथे हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत. क्रिती सनॉननेही हार्ट इमोजी बनवून त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. याआधीही कबीर दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये क्रितीच्या घरी दिसला होता.
कोण आहे कबीर बहिया?कबीर बहिया हा एक ब्रिटीश व्यापारी असून त्याने आपले शालेय शिक्षण इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमधून केले आहे. तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचे संस्थापक देखील आहे. यूके स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे मालक कुलजिंदर बहिया यांचा तो मुलगा आहे.
वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, क्रिती सनॉन शेवटची काजोल आणि शाहीर शेखसोबत दो पत्तीमध्ये दिसली होती. हा क्राईम थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटातून क्रितीने निर्माती म्हणूनही पदार्पण केले.