Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुळ्या मुलींचा चेहरा कधी दाखवणार? क्रांती रेडकर म्हणाली, 'सध्या समीरजींमुळे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 17:23 IST

क्रांतीच्या मुलींना कधी बघता येईल याचं उत्तर आता स्वत: क्रांतीनेच दिलं आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या गोंडस जुळ्या मुलींचे भन्नाट किस्से ती शेअर करत असते. ३ डिसेंबर २०१८ रोजी क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यांची नावंही खूप खास आहेत. झायदा आणि झिया अशी तिच्या मुलींची नावं आहेत. मात्र अद्याप क्रांतीने मुलींचा चेहरा कुठेही दाखवलेला नाही. क्रांतीच्या मुलींना कधी बघता येईल याचं उत्तर आता स्वत: क्रांतीनेच दिलं आहे.

एका अवॉर्ड सोहळ्यात क्रांतीने रेड कार्पेटवर मुलाखत दिली. यामध्ये तिला जुळ्या मुलींचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर क्रांती म्हणाली, 'मला असं वाटतं त्यांना किमान पाच वर्षाचं तरी झालं पाहिजे. तसंच त्यांना जर वाटत असेल की आपल्याला सोशल मीडियावर दिसायचं आहे तरच मी त्यांचा चेहरा रिव्हील करेन. पण आता सध्या समीरजींमुळे इतक्या धमक्यांची भीती आहे तर आम्ही त्यांना सध्या थोडंसं सोशल मीडिया आणि लोकांच्या नजरेपासून लांबच ठेवतो.'

तर या मुलाखतीतून क्रांतीने आता स्पष्टच केलंय की इतक्यात तरी तिच्या दोन मुलींचा चेहरा दिसणार नाही. क्रांतीचे पती समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये मुख्य अधिकारी होते. नुकतेच आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. यानंतर त्यांना अनेक धमक्याही आल्या. सतत आम्हाला धमक्यांचे फोन येत असतात असं मध्यंतरी क्रांतीने सांगितलं होतं. यानंतर मात्र आता क्रांती मुलींच्या सुरक्षेबाबत जास्त खबरदारी घेत आहे. 

टॅग्स :क्रांती रेडकरमराठी अभिनेतापरिवारसोशल मीडिया