'बिग बॉस मराठी' फेम आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अंकिता वालावलकर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अंकिता कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू आहे. अंकिता आणि कुणालच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच मेहेंदी सोहळा पार पडला.
मेहेंदी सोहळ्यासाठी अंकिताने वेस्टर्न आऊटफितला पसंती दिली. मेहेंदी सोहळ्यासाठी अंकिता आणि कुणालने ट्विनिंग केलं होतं. अंकिताचे मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. अंकिताच्या हातावर कुणालच्या नावाची मेहेंदी रंगली आहे. अंकिता आणि कुणाल कोकणात लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर कोकणात पोहोचले आहेत. डीपी दादा म्हणजे धनंजय पोवारही अंकिताच्या लग्नासाठी पोहोचला आहे. मेहेंदी सोहळ्यानंतर अंकिता आणि कुणालच्या टीममध्ये समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेटचा सामनाही रंगला.
कोण आहे कुणाल भगत?
कुणाल भगत हा सुप्रसिद्ध संगीतकार असून त्याने अनेक मालिका, सिनेमांच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. कुणाल आणि अंकिता गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत असं समजतंय. कुणालच्या सोशल मीडियावर त्याचे अंकितासोबतचे खास फोटो पाहायला मिळतात. अंकिताने बॉयफ्रेंड कुणालचा चेहरा दाखवताच अनेकांनी या जोडीचं अभिनंदन केलंय. याशिवाय भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.