Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून मुंबईत लागलेले शर्मिला टागोर यांचे बिकिनीतील पोस्टर्स एका रात्री उतरवण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 19:30 IST

.'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमासात शर्मिला यांनी बिकीनी सीन दिले होते. या सीनची प्रचंड चर्चाही झाली होती. त्यांचे बिकीनी पोस्टरसुद्धा मुंबईत लावण्यात आले होते. 

सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार हटके गोष्टी करत सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतात. सध्याच्या युगात सिनेमाच्या प्रमोशनाला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावर सिनेमाचं कलाकार प्रमोशन करण्याची संधी सोडत नाहीत. कलाकार सोशल मीडियावरही बरेच एक्टिव्ह आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरुन आपल्या सिनेमाचे प्रमोशन करत आपल्या फॅन्सशी हे कलाकार संवाद साधतात. नुसते सिनेमाचं नाही तर सतत पब्लिसिटी मिळत राहावी यासाठी  सोशल मीडियावर वारंवार आपले बोल्ड फोटो शेअर करत वाहवा मिळवताना दिसतात. 

आजपासून जवळपास ४० वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया किंबहुना मीडियाचा इतका गाजावाजा नव्हता त्या काळातही काही सेलिब्रिटी प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करायचे. हे वाचून कदाचित तुम्हाला नवलही वाटेल. मात्र काही सेलिब्रिटी झगमगत्या चंदेरी दुनियेत प्रसिद्ध असूनही बोल्ड फोटोशूट करत प्रसिद्धीझोतात असायचे. हा किस्सा आहे ज्येष्ट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा. शर्मिला बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री शर्मिला टागोर ठरल्या होत्या.'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमासात शर्मिला यांनी बिकीनी सीन दिले होते. या सीनची प्रचंड चर्चाही झाली होती. त्यांचे बिकीनी पोस्टरसुद्धा मुंबईत लावण्यात आले होते. 

 मन्सूर अली खान पटौदी सोबत शर्मिलाचे अफेयर चालू होते. त्याचवेळी मन्सूर अली खान पटौदी यांची आई साजिदा सुल्तान शर्मिला यांना भेटण्यासाठी मुंबईत येणार होत्या.  शर्मिला यांना ही बाब कळताच त्यांना प्रचंड टेशन आले होते. होणाऱ्या सुनेचे असे बिकीनी पोस्टर पाहून शर्मिलाचे लग्न मन्सूर अली पटौदी यांच्यासह होणार नसल्याचे भीती शर्मिला यांना सतावत होती. त्यामुळे मन्सूर अली खान पटौदी यांची आई मुंबईला येणार त्याआधीच मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स निर्मात्यांना काढून टाकण्यास सांगितले होते.

टॅग्स :शर्मिला टागोर