Join us
Daily Top 2Weekly Top 5

किरण मानेंनी खरेदी केली मर्सिडीज कार; फोटो शेअर करत म्हणाले, "ही मोठी गोष्ट नाही, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 12:21 IST

दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात राज्य करणाऱ्या किरण मानेंनी नुकतीच मर्सिडीज कार खरेदी केली आहे. 

'बिग बॉस मराठी' फेम किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. किरण मानेंनी अनेक नाटक आणि गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयाच्या जोरावर किरण मानेंनी मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. समाजातील घडामोडींवरही माने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात राज्य करणाऱ्या किरण मानेंनी नुकतीच मर्सिडीज कार खरेदी केली आहे. 

किरण मानेंनी त्यांच्या मर्सिडीजचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. "ही मोठी गोष्ट नाही. पण, हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. मी तरुण होतो तेव्हा मर्सिडीज माझं स्वप्न होतं. आता ते स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझी प्रिय मर्सी, वेलकम टू फॅमिली" असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. 

परिणीती-राघव यांच्या लग्नात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लावले ठुमके; भगवंत मान यांचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, किरण माने कलर्स वाहिनीवरील 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेत ते सिधुंताई सकपाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. 

टॅग्स :किरण मानेबिग बॉस मराठीमर्सिडीज बेन्झ