Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंशुक महाजनची 'या' मालिकेत होणार एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 13:02 IST

'सिलसिला बदलते रिश्तों' कामध्ये 6 वर्षांची झेप घेतली जाणार आहे आणि त्यात कुणाल (शक्ती अरोरा), मौली(अदिती शर्मा) आणि नंदिनी (द्राष्टी धामी) यांच्या जीवनात खूप मोठा बदल झाल्याचे पहायला मिळणार आहे

कलर्सच्या सिलसिला बदलते रिश्तों का मध्ये 6 वर्षांची झेप घेतली जाणार आहे आणि त्यात कुणाल (शक्ती अरोरा), मौली(अदिती शर्मा) आणि नंदिनी (द्राष्टी धामी) यांच्या जीवनात खूप मोठा बदल झाल्याचे पहायला मिळणार आहे. शोपुढे सरकत असताना, मौली, दिदा (नीना चिमा) आणि राधिका (जया भट्टाचार्य) दिवाळीच्या तयारीत गुंतलेल्या असतात तेव्हा मौलीचा एक मित्र ईशान चर्चेचा विषय असतो. त्यानंतर दिवाळी साजरी करण्यासाठी त्याला बोलावण्याचे ठरविते. ईशानचे पात्र साकारणार आहे टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता किंशुक महाजन.

किंशुक साकारत असलेले ईशानचे पात्र म्हणजे एक बिझनेसमन आहे आणि त्याची खूप सारी हॉटेल आहेत. दोन वर्षांपूर्वी तो मौलीला एका प्रेस कॉन्फरन्समध्ये भेटला होता आणि तेव्हा पासून ते दोघे चांगले मित्र बनले होते. ईशान निराश मौलीचा खूप मोठा पाठिराखा बनलेला आहे आणि तिच्या प्रत्येक सुखदुःखात तो पाठीशी उभा आहे. मौली विषयी ईशानच्या मनात मृदु भावना आहे पण ती तो त्यांच्या मैत्री मध्ये येऊ देत नाही. त्याचे तिच्या मुलीवर मिश्टीवर सुध्दा खूप प्रेम आहे.

या भूमिकेविषयी बोलताना किंशुक महाजन म्हणाला, “सिलसिला बदलते रिश्तों का हा शो संवेदनशील विषय हाताळत आहे आणि तो प्रेक्षकांमध्ये सुध्दा खूप लोकप्रिय आहे. शोमध्ये आता खूप मोठा बदल घडून येणार आहे आणि त्यात प्रमुख पात्र म्हणून सहभागी होण्याची मला संधी मिळाली आहे. माझे पात्र असलेला ईशान मौलीच्या जीवनात बदलाची लहर आणणार आहे आणि जगाकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी तिला मदत करणार आहे. या शो मध्ये काम करण्याचा आणि गुणवान अभिनेत्यां सोबत काम करण्याचा मला खूप आनंद झाला आहे.”

 

टॅग्स :दृष्टि धामी