Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहब्बते गर्ल किम शर्माचं झालं ब्रेकअप? लिएंडर पेससोबतच्या नात्यात आला दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:27 IST

किम शर्मा तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत असते. किम शर्मा अनेक दिवसांपासून भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये आहे, पण...

हिंदी सिनेसृष्टीतील सुपरहिट चित्रपट 'मोहब्बतें' द्वारे आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री किम शर्मा तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत असते. किम शर्मा अनेक दिवसांपासून भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण आता किम आणि पेसच्या नात्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की या कपलमध्ये सर्व काही ठीक चालले नाही, ज्यामुळे पेस आणि किमचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. 

किम शर्मा आणि लिएंडर पेसचं झालं ब्रेकअप ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, लिएंडर पेस आणि किम शर्मा यांच्या नात्यातील अंतर वाढले आहे. त्यामुळे या दोघांचे मार्ग लवकरच वेगळे होऊ शकतात. किम आणि पेसच्या व आहे की अलीकडेच 28 मार्च रोजी त्यांच्या रिलेशनशीपची दुसरी अॅनिव्हरी होती त्यादरम्यान किम शर्मा आणि लिएंडर पेसची कोणतीही पोस्ट सोशल मीडिया शेअर केली नाही. 

याशिवाय अलाना पांडेच्या लग्नात किम एकटीच पोहोचली होती. त्यामुळे किम आणि पेसच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाबाबत या कपलकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

टेनिस स्टार लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी किम शर्माचे नाव बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतही जोडले गेले आहे. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर किम आणि हर्षचे ब्रेकअप झाले आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगसोबत किम शर्माचं नावही खूप चर्चेत आलं. 

टॅग्स :किम शर्मालिएंडर पेस