Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट नाही तर ही अभिनेत्री आहे बच्चे कंपनीची फेव्हरेट, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 06:00 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने फक्त देशातीलच नाही जगभरातील लोकांना आपल्या तालावर थिरकवले आहे

दिलबर दिलबर म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी कॅनेडियन डान्सर व अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या दमदार परफॉर्मन्सने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. नोराचे फक्चत भारतातच चाहते नसून जगभरात आहेत. इतकंच नाही तर या चाहत्या वर्गामध्ये तरूणच नाही तर बच्चेकंपनीचाही समावेश आहे. 

नुकताच सोशल मीडियावर बच्चे कंपनीचे काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक गोष्ट समान आहे ती म्हणजे नोरा फतेही. हे दोन व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की नोराला बच्चे कंपनी किती पसंत करते. या व्हिडिओत एका मुलीला विचारले की, तुझा फेव्हरिट अॅक्टर कोण आहे, त्यावर त्या मुलीने उत्तर दिले नोरा व आलिया भट. त्यानंतर या दोघांपैकी कोण जास्त आवडतं. त्यावर त्या मुलीने उत्तर दिलं की पहिली नोरा मग आलिया.

काही महिन्यांपूर्वी नोराने पॅरिसमधील ओलंपियामध्ये पिंक फ़्लॉइड, द बीटल्स, जेनेट जैक्सन, मैडोना आणि टेलर स्विफ्ट यांच्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले.

नोराचे हे पहिले म्युझिक कॉन्सर्ट होते आणि तिने दिलबर, साकी साकी, कमरिया व एक तो कम जिंदगानी यासारखी गाणी गायली होती. हा हाऊसफुल शो होता. जिथे भारत, मध्य पूर्व व मोरक्कोमधून लोक आले होते. तसेच तिने तिचा अल्बम इंग्रजी गाणं पेपेटा व दिलबरचे अरबी व्हर्जनही गायले.

टॅग्स :आलिया भटनोरा फतेही