Join us

'तारे जमीन पर'मधील चिमुकला दर्शील सफारीला आता ओळखणं झालंय कठीण, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:14 IST

२४ वर्षीय दर्शील आता पहिल्यापेक्षा जास्त हॅण्डसम झाला आहे. त्याचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सुपरहिट चित्रपट तारे जमीन परमध्ये ईशानची भूमिका बालकलाकार दर्शील सफारीने केली होती. २००७ साली रिलीज झालेल्या या चित्रपटात दर्शील सफारीने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळवली होती. या चित्रपटाला रिलीज होऊन आता १४ वर्षे झाली आहेत आणि आता दर्शील बराच मोठा झाला आहे. २४ वर्षीय दर्शील आता आधीपेक्षा खूप हॅण्डसम झाला आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. त्याचा हा फोटो पाहून लोकांना हा चिमुकला ईशान आहे यावर विश्वास बसत नाही.

छोट्या वयात दर्शील सफारीने राष्ट्रीय पुरस्कार जिंकून सर्वांना हैराण केले होते. दर्शीलचा जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यात तो ब्लॅक रंगाचा चष्मा आणि व्हाइट टीशर्टमध्ये दिसतो आहे. हा फोटो पाहून त्याला लोकांना ओळखणे कठीण झाले आहे. तर काहींनी त्याला ओळखले. सध्या त्याचा हो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे, या फोटोवर लोक आपापली प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, तुम्हाला पाहून हेच वाटते की तू तितकाच हुशार आहेस, जेवढा तारे जमीनपरमध्ये होता. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, तुला पाहून मी ओळखू शकलो नाही. तर काहींनी त्याला मनी हाइस्टचा प्रोफेसर आणि निक जोनासचा मिक्स्चर सांगितले. 

टॅग्स :दर्शील सफारीआमिर खान