Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray : खुपते तिथे गुप्ते! राज ठाकरे 'धमाका' करणार; अशी पहिलीच मुलाखत देणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 16:49 IST

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या पहिल्याच राज ठाकरे यांच्या मुलाखतीमुळे चांगलाच वाजणार आणि गाजणार आहे.

 गायक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेला अवधूत गुप्तेचा 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम पुन्हा सुरु होणार आहे.जवळपास १० वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचे आधीचे पर्व ही प्रचंड गाजले होते.  या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हजेरी लावणार आहेत. 

नुकतंच या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण झाले. यावेळी दरम्यानचा प्रोमो 'झी मराठी' वाहिनीने शेअर केला आहे.  पायात लेदरची मोजडी, अंगावर खादीचा निळ्या रंगाचा  कुर्ता आणि वागण्यात रुबाब  असा काहीसा लूक असलेला एक नेता दिसत आहे. या प्रश्नोत्तरांच्या खुर्चीत बसणारे पहिले वहिले व्यक्तिमत्त्व कोण?, असं म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे.

या कार्यक्रमासंबंधी लोकमत फिल्मीशी राज ठाकरेंनी यांनी बातचित केली.  'खुप्ते तिथे गुप्ते' याआधीचे एपिसोड राज ठाकरे यांनी पाहिले असल्याचे त्यांनी सांगितलं तसेच मुलाखत देताना हा कार्यक्रम आपण एन्जॉय केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. हा एक वेगळा अनुभव होता याआधी मी अशा प्रकाराची मुलाखत कधी दिली नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचं प्रत्येक भाषण ऐकण्यासाठी लोकांची  अलोट गर्दी होते.  त्यांची बोलण्याची शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरते. त्यांच्या प्रत्येक भाषणात नावीण्य असतं. त्यामुळे आता 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात राज ठाकरे हजेरी लावणार असल्याने हा भाग पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम 4 जूनपासून सुरु होणार आहे.

टॅग्स :राज ठाकरेअवधुत गुप्ते