Join us

KGF Chapter 2: 'अभिनेता यशने स्वतः त्याचे...',KGF 2 बाबत दिग्दर्शक प्रशांत नीलने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:48 IST

KGF Chapter 2: बंगळुरुमध्ये पार पडलेल्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने अभिनेता यशबाबत मोठा खुलासा केला आहे.

KGF Chapter 2: नुकताच 'KGF Chapter 2' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरला अवघ्या 24 तासांत 110+ मिलीयन व्ह्यू मिळाले आहेत. बंगळुरुमध्ये याचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. यावरुनच चित्रपट मोठा हिट होणार, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. दरम्यान, या सोहळ्यात कलाकारांनी चित्रपटात काम करतानाचे त्यांचे अनुभव शेअर केले. 

KGF-1 रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. चित्रपटातील संवाद खूप लोकप्रिय झाले, यावर असंख्य रील्सही तयार करण्यात आल्या. आता याच्या दुसऱ्या भागातील संवादाबाबतही उत्सुकता वाढली आहे. ट्रेलर लॉन्च सोहळ्यात दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटातील संवादाबाबत एक मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटातील रॉकी या मुख्य पात्राचे अनेक संवाद रॉकिंग स्टार यशने स्वतः लिहीले आहेत. 

'KGF Chapter 2' हा पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी देशभरात कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले असून, चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. होमबेल फिल्म्स या बॅनरखाली विजय किरगांडूर यांनी या चित्रपटाचे निर्मिती केली असून, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि एए फिल्म्सद्वारे उत्तर-भारतीय बाजारपेठेत हा सादर केला जात आहे.

टॅग्स :केजीएफयश