दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश सध्या तेलगू आणि तामिळ चित्रपटात बिझी आहे. पण हीच किर्ती आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. होय. ताजी बातमी खरी मानाल तर किर्तीने एक बॉलिवूड चित्रपट साईन केलाय. बोनी कपूर हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. ‘बधाई हो’चे दिग्दर्शक अमित शहा हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याची खबर आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा होईल, अशी शक्यता आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशचा होणार बॉलिवूड डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 21:00 IST
दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश सध्या तेलगू आणि तामिळ चित्रपटात बिझी आहे. पण हीच किर्ती आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.
दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशचा होणार बॉलिवूड डेब्यू!!
ठळक मुद्देकिर्ती ही साऊथचे निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. सन २००० मध्ये बालकलाकार म्हणून तिने अभिनय सृष्टीत पाऊल ठेवले.