Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर या व्यक्तिमुळे सारा अली खानची लागली होती 'सिम्बा'मध्ये वर्णी, चक्क रोहित शेट्टीजवळ करण्यात होती शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 12:55 IST

सारा अली खानच्या केदरानाथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. पाहिल्याच सिनेमातून साराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत

ठळक मुद्देसिम्बा’हा सिनेमा साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे

सारा अली खानच्या केदरानाथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. पाहिल्याच सिनेमातून साराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने साराबाबत एका खुलासा केला आहे. अभिषेकने सांगितले की, ''साराला सिम्बामध्ये कास्ट करण्यासाठी त्यांनेच रोहित शेट्टीला सांगितले होते. ज्यामधल्या दिवसात आम्ही सिनेमाचे शूटिंग करतो नव्हतो. त्यावेळी मीच रोहित शेट्टीला फोन करुन साराला सिम्बामध्ये घेण्यासाठी सांगितले होते आणि साराने सिनेमासाठी होकार दिला.''   

सिम्बामध्ये साराच्या अपोझिट रणवीर सिंग दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे. ‘सिम्बा’हा सिनेमा साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.

‘सिम्बा’या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या सिनेमात भरपूर अॅक्शन आणि कॉमेडी करताना दिसणार आहे. या सिनेमातील ‘आंख मारे’ हे गाणे  तुफान लोकप्रिय झाले आहे. यापूर्वी रिलीज झालेले या चित्रपटाचे ‘आंख मारे’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले आहे.  हे गाणे अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’ चे रिमिक्स व्हर्जन आहे. हे नवे व्हर्जन मिका सिंग व नेहा कक्कडने गायले आहे.  येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

टॅग्स :सारा अली खानसिम्बारोहित शेट्टी