Join us
Daily Top 2Weekly Top 5

"राजा माणूस....", राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 17:38 IST

अनेकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या दोघांच्या मैत्रिची कौतुक केलं आहे.

मनसेप्रमुखराज ठाकरे यांचा आज 14 जून रोजी वाढदिवस असतो. मात्र, यंदा ते क्वारंटाईन असल्याने आणि प्रकृतीच्या कारणास्तव कोणालाही भेटणार नाहीत. असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्त अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.

अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदेंनी देखील राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी व्हायरल होतोये. राजा माणूस... @raj_shrikant_thackeray वाढदिवस शुभेच्छा. अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे. तसेच राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटोदेखील त्यांनी पोस्ट केला आहे. केदार शिंदे यांच्या या पोस्टवर अनेकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या दोघांच्या मैत्रिची कौतुक केलं आहे. वाढदिवस_साहेबांचा_वाढदिवस_लोकप्रिय_माणसाचा #वाढदिवस_अभ्यासू_नेतृत्वाचा आदरणीय साहेब, तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र विराजमान होवो. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना. आपणांस वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा. अशी कमेंट एका चाहत्यांने केली आहे.

दरम्यान, माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळी करता आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी (१४ जून) माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी दरवर्षी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळतं. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :केदार शिंदेराज ठाकरे