Join us
Daily Top 2Weekly Top 5

सतत तीन वर्ष करत होती मातृत्त्वासाठी प्रयत्न, कुटुंब परिपूर्ण करण्यासाठी काश्मिराला करावा लागला बऱ्याच अडचणींचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 12:21 IST

लग्नानंतर, कश्मिराचा खरा संघर्ष सुरू झाला तो आई बनण्यासाठी, मात्र काही कारणांमुळे तिला गर्भधारणा होत नव्हती. सरोगसी तंत्रज्ञानाच्या मदतीनं काश्मिरा आणि कृष्णाच्या आयुष्यात जुळ्या मुलांचे आगमन झाले होते.

नुकतेच बिग बॉस 14 सिझनमध्ये  काश्मिरा शहा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. घरात तिची कामगिरी पाहिजे तशी समाधानकारक आणि रंजक नव्हती. त्यामुळे फार काळ न राहता अल्पावधीतच ती घरातून बाहेर पडली. घराबाहेर येताच एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर काश्मिरा सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे, पती कृष्णा अभिषेकनेच काश्मिराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काश्मिरादेखील इंडस्ट्रीत प्रसिद्ध नाव आहे. मात्र सिनेमांपेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बर्‍याचदा चर्चेत राहिली आहे.  कृष्णा आणि काश्मिरा दोघांनी 2015 मध्ये लग्न केले होते. त्याआधी बरेच वर्ष दोघेही एकमेकांना  डेट करत होते. दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी पटल्या त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

'पप्पू पास हो गया' या सिनेमाच्या सेटवर या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. शूटिंगनंतर दोघेही बराच वेळ एकत्र घालवायचे, त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि बघता- बघता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

कश्मिराचे कृष्णासह हे दुसरे लग्न आहे. 2007 मध्ये, काश्मिराने पहिला पती ब्रॅड लिस्टरमॅनला घटस्फोट दिला आणि कृष्णाबरोबर  लिव्ह-इनमध्ये राहायला सुरुवात केली होती. 

 लग्नानंतर, कश्मिराचा खरा संघर्ष सुरू झाला तो आई बनण्यासाठी, मात्र काही कारणांमुळे तिला गर्भधारणा होत नव्हती. सरोगसी तंत्रज्ञानाच्या मदतीनं  काश्मिरा आणि कृष्णाच्या आयुष्यात जुळ्या मुलांचे आगमन झाले होते. एका मुलाखतीत काश्मिरीने सांगितले होते की, नैसर्गिक गर्भधारणा होण्यासाठी 14 वेळा  प्रयत्न केले.

तीन वर्ष मी यासाठी संघर्ष करत होते.शेवटी सलमान खानने सरोगेसीचा सल्ला दिला जो त्यांच्यासाठी खूप प्रभावी ठरला. कृष्णा-काश्मिरा आयवीएफच्या माध्यमातून जुळ्या मुलांचे पालक बनले.

मुलांच्या आगनानंतर त्यांचे कुटुंबही पूर्ण झाले आणि आनंदाने कपल त्यांचे आयुष्य एन्जॉय करत आहेत. अनेकांनी काश्मिरावर टीकाही केली होती, मात्र या सगळ्या गोष्टींना महत्त्व न देता. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहत कश्मीरानं अतिशय सुरेखपणे जुळ्या मुलांचं मातृत्वं स्वीकारलं. 

टॅग्स :कृष्णा अभिषेक