Join us

'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेता प्राचीन चौहानला अटक, तरूणीची छेड काढल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 12:25 IST

अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीशी गैरवर्तन करून तिची छेड काढल्याच्या आरोपांखाली पोलिसांनी अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी नागिन फेम अभिनेता पर्ल वी पुरीला अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारांनी पर्लला पाठिंबा दर्शवला होता. काही दिवसांनी पर्लची जामिनावर सुटकादेखील झाली. मात्र या प्रकरणाला काही दिवस उलटलेले असताना आता आणखी एका टीव्ही अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीशी गैरवर्तन करून तिची छेड काढल्याच्या आरोपांखाली पोलिसांनी अटक केली आहे.

'कसौटी जिंदगी की' मालिकेतील अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीशी गैरवर्तन आणि छेड काढल्याच्या आरोपाखाली मालाड पूर्व पोलिसांनी अटक केली आहे. प्राचीन हा देखील पर्ल पुरीप्रमाणेच एकता कपूर प्रोडक्शनशी जोडलेला होता.

मीडिया रिपोर्टनुसार पीडित तरूणीने तक्रार केल्यानंतर प्राचीनच्या विरोधात पोलिसांनी आयपीसी कलम ३५४, ३४२, ३२३ आणि ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.

प्राचीन चौहानने 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. या मालिकेत त्याने सुब्रको बसू ही भूमिका केली होती. त्यानंतर त्याने 'कुछ झुकी पलकें', 'सिंदूर तेरे नाम का', 'सात फेरे' आणि 'माता पिता के चरणों में स्वर्ग' या मालिकेत काम केले. 

टॅग्स :एकता कपूर