Join us
Daily Top 2Weekly Top 5

Naagzilla OTT Release: 'इच्छाधारी नागा'च्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता; OTTवर कधी येणार चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 18:59 IST

'नागझिला' हा चित्रपट एका अशा काल्पनिक जगावर आधारित आहे, जिथे रूप बदलणारे 'इच्छाधारी नाग' मानवी वस्तीत गुपचूप राहतात.

बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' कार्तिक आर्यन आता एका अत्यंत वेगळ्या आणि खास भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या 'नागझिला' (Nagzhilla) या चित्रपटात कार्तिक चक्क एका 'इच्छाधारी नागा'ची भूमिका साकारणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या थिएटर आणि ओटीटी प्रदर्शनाबाबत नुकतीच मोठी माहिती समोर आली आहे.

'नागझिला' हा चित्रपट एका अशा काल्पनिक जगावर आधारित आहे, जिथे रूप बदलणारे 'इच्छाधारी नाग' मानवी वस्तीत गुपचूप राहतात. कार्तिक यात एका बेफिकीर इच्छाधारी नागाची भूमिका साकारत आहे. मात्र, जेव्हा एका धूर्त आणि सत्तालोभी खलनायकाची नजर त्याच्या मौल्यवान 'नागमणी'वर पडते, तेव्हा कार्तिकचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. हा चित्रपट अ‍ॅक्शन, फँटसी आणि ड्रामाने परिपूर्ण असणार आहे.

कधी होणार प्रदर्शित?मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित 'नागझिला'चे चित्रीकरण सध्या वेगाने सुरू आहे. कार्तिकने सेटवरील काही झलक यापूर्वीच सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपटगृहातील प्रदर्शनानंतर हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल, अशी घोषणा गुरुवारी एका कार्यक्रमात करण्यात आली.

कार्तिकचे आगामी प्रोजेक्ट्स'नागझिला' व्यतिरिक्त कार्तिक आर्यनचे आणखी दोन मोठे चित्रपट रांगेत आहेत. अनुराग बसू दिग्दर्शित 'तू मेरी जिंदगी है' या रोमँटिक ड्रामामध्ये तो दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सोबत दिसणार आहे. तसेच, हंसल मेहता यांच्या 'कॅप्टन इंडिया' या बायोपिकमध्येही तो मुख्य भूमिका साकारत आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूड