Join us

'बॉलिवूड एकीकडे अन् कार्तिक आर्यन...', कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझने केलं 'रूह बाबा"चं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:01 IST

अभिनेता दिलजीत दोसांझने 'सिंघम 3' आणि 'भूल भुलैया 3' च्या संघर्षावर उघडपणे प्रतिक्रियाही दिली.

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. नुकतंच दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन पोहचला.  कॉन्सर्टमध्ये कार्तिक आणि दिलजीतमधील बॉन्ड पाहायला मिळाला. दोघांनीही स्टेजवर एकमेकांना मिठी मारली. यावेळी दिलजीतने कार्तिकचं कौतुक केलं. एवढचं काय तर त्याने थेट 'सिंघम 3' आणि 'भूल भुलैया 3' च्या संघर्षावर उघडपणे प्रतिक्रियाही दिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्तिक आर्यन पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या अहमदाबादमधील शोमध्ये सहभागी झाला होता. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर दिलजीतसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये दिलजीत आणि कार्तिक दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. एका फोटोमध्ये कार्तिक दिलजीतला मिठी मारताना दिसत आहे. कार्तिकबद्दल दिलजीत म्हणाला,  "हा कलाकार स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. मेहनतीच्या बळावर त्याने बॉलिवूडमध्ये एक वेगेळी ओळख मिळवली आहे. मी खूप आदर करतो. यावेळी तर संपूर्ण बॉलिवूड एका बाजूला आणि कार्तिक आर्यन दुसऱ्या बाजूला होतं".

एवढचं काय तर कार्तिक आणि दिलजीत यांनी एकत्र स्टेजवर परफॉर्म केलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिलजीत कार्तिकच्या "भूल भुलैया 3" मधील "हरे कृष्णा हरे राम" हे टायटल साँग गाताना दिसला. या गाण्यावर कार्तिक आर्यन आणि दिलजीतने खास स्टेप केल्या. दरम्यान, अहमदाबादमनंतर आता दिलजीत लखनऊमध्ये परफॉर्म करणार आहे. यानंतर तो पुणे, कोलकाता, बेंगळुरू, इंदूर आणि चंदीगड येथे परफॉर्म करणार आहे. 29 डिसेंबर रोजी गुवाहाटी येथे त्यांच्या दौऱ्याचा समारोप होणार आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनदिलजीत दोसांझ