Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूर खानला द्यायचा होता गोंडस मुलीला जन्म, तैमुरच्या जन्माआधी तिला सतत विचारले जायचे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 15:08 IST

तैमुरच्या जन्माआधी ती जिथे जायची तिथे तिला मुलगा हवा की मुलगी असाच प्रश्न विचारले जायचे. यावर मुलगा असो किंवा मुलगी काही फरक पडत नाही. आई होताना दोन्ही सारखेच असतात असे ती सांगायची.

करीना कपूर खान दस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. सध्या ती तिची प्रेग्नंसी खूप एन्जॉय करत आहे. प्रेग्नंट असूनही विश्रांती न घेता ती तिच्या कामात व्यस्त आहे. स्वतःची योग्य रितीने काळजी घेत ती सध्या बाळाच्या आगमनाची वाट बघत आहे. दरम्यान करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीमधला हा व्हिडीओ आहे.  या मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिने एका गोंडस मुलीला जन्म देण्याची तिची ईच्छा असल्याचे सांगितले होते. मुलगी नाही पण तिने मुलाला जन्म दिला त्याचे नाव आहे तैमुर.

तैमुरच्या जन्माआधी ती जिथे जायची तिथे तिला मुलगा हवा की मुलगी असाच प्रश्न विचारले जायचे. यावर मुलगा असो किंवा मुलगी काही फरक पडत नाही. आई होताना दोन्ही सारखेच असतात असे ती सांगायची. तसेच आजही मुलगा मुलगी असे भेदभाव पाहायला मिळतात. जे मुलींना समान दर्जा देत नाहीत त्यांना हे माहित असावे की एक स्त्री देखील एख जीव आहे. जिच्यात एका जीवाला जीवन देण्याची क्षमता असते. 

करीना कपूरचा आणखी व्हिडिओ बॉलिवूड व्हायरलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये समाजावर तिथे प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. " आधी खूप आभ्यास करा, आभ्यास करता करता चष्मा लागलाच तर चश्मिश म्हणून चिडवले जाते. लिपस्टिक लावली तर हिरोईन म्हणून चिडवतात. चारित्र्यावर शंका उपस्थित करू नये म्हणून इतरांच्या भीतीपोटी लवकर घरी या. पण या सगळ्यांमध्ये माझा जगण्याचा हक्क कुठे आहे.

सैफशी लग्न झाल्यानंतर लाईफ बदलली नसल्याचं बेबोने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. लग्नाधी लग्न कधी करणार, लग्न झाल्यानंतर आई बनण्याबाबत विचारल्या जाणा-या प्रश्नानं बेबो अर्थात करिना कपूर चांगलीच वैतागली होती. स्त्रीसाठी आई बनणं एवढंच काही नसतं असा सवाल तिनं हा प्रश्न विचारणा-यांना केला होता.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुर