Join us

SO CUT : पाहा, असे दिसते बेबोचे बाळ; करिना कपूरने पहिल्यांदाच दाखवला त्याचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 13:27 IST

Kareena Kapoor : बेबोने बाळाला जगापासून लपवून ठेवले.  मात्र आज मदर्सच्या निमित्ताने का होईना, अखेर छोट्या नवाबाचा चेहरा चाहत्यांना दिसलाच.

ठळक मुद्देकरिनाने याआधी तिच्या लहान मुलाचे काही फोटो शेअर केले होते. पण यात बाळाचा चेहरा दिसणार नाही, याची काळजी घेतली होती.

करिना कपूर (Kareena Kapoor) दुस-यांदा आई झाली. करिनाचा या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक झालेत. पण बेबोने बाळाला जगापासून लपवून ठेवले.  मात्र आज मदर्सच्या निमित्ताने का होईना, अखेर छोट्या नवाबाचा चेहरा चाहत्यांना दिसलाच.मदर्स डेचे औचित्य साधत बेबोने आपल्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर केला. बेबोने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या लहान मुलाचा चेहरा दिसत आहे. या फोटोमध्ये तैमूर आपल्या लहान भावाला मांडीवर घेऊन बसल्याचे दिसतेय. (Kareena Kapoor Shares First Picture of Her Baby Boy)

या फोटोला बेबोने दिलेले कॅप्शनही लक्षवेधी आहे. ‘आशेवरच जग कायम आहे आणि हे दोघंही एका चांगल्या दिवसासाठीची आशा मला देतात. तुम्हा सर्व सुंदर आणि भक्कम मातांना मदर्स डेच्या शुभेच्छा! विश्वास ठेवा,’ असे तिने लिहिले आहे.करिनाने याआधी तिच्या लहान मुलाचे काही फोटो शेअर केले होते. पण यात बाळाचा चेहरा दिसणार नाही, याची काळजी घेतली होती.काही दिवसांपूर्वीच करिनाचे वडील रणधीर कपूर यांच्या अकाऊंटवरुन एका बाळाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यांना दोन फोटो कोलाज करुन फोटो पोस्ट केला मात्र काहीच वेळात ही पोस्ट डिलीट केली गेली.   हा फोटो करिनाच्या लहान मुलाचा होता, अशी चर्चा यावेळी रंगली होती.

2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्याने तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटले जाते. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचे नाव ठेवावे, यावर लोकांचा आक्षेप होता. या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर करिना व सैफने आपल्या दुस-या मुलाचे नाव अद्याप जाहिर केलेले नाही.  

टॅग्स :करिना कपूर