Join us
Daily Top 2Weekly Top 5

या हॉलिवूड अभिनेत्रीवर आहे करिना कपूरचं क्रश, तिनेच केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 12:33 IST

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आजकाल तिच्या प्रेग्नेंसीला घेऊन चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आजकाल तिच्या प्रेग्नेंसीला घेऊन चर्चेत आहे. करिना आपले बेबी बम्पचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. करिना कपूरने आपल्या क्रशबद्दल खुलासा केला आहे.

पेनेलोपे क्रूझवर आहे करिना कपूरचे क्रशहॉलिवूड अभिनेत्री आणि ऑस्कर विजेता पेनेलोपे क्रूझ नेहमीच करिना कपूरचे वुमन क्रश असल्याचे करिना कपूरने सांगितले आहे. पेनेलोपे क्रूझ आणि करीना कपूरमध्ये काही समानता आहे. दोघेही यशस्वी स्त्रिया आहेत. यासोबतच दोघेही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

फेब्रुवारीत देणार दुसऱ्या बाळाला जन्म करीना कपूर फेब्रुवारी 2021 मध्ये तिच्या दुसर्‍या बाळाला जन्म देणार आहे. या आधी ती आपले सगळे ऑफिशियल कमिटमेंट्स पूर्ण करण्यात बिझी आहे.   अलीकडेच ती तिचा पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत धर्मशालाला व्हॅकेशन एन्जॉय करायला गेली होती. तिथे सैफ अली खान त्याच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत होता.

करिना कपूरचे येणारे सिनेमावर्कफ्रंटबद्दल बोलायचे  झाले तर करिना कपूर 'लालसिंग चड्ढा' सिनेमात आमिर खानसोबत दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये तिने त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात करिना कपूर करण जोहरच्या मल्टीस्टारर सिनेमा 'तख्त' मध्ये काम करताना दिसणार आहे. 

अलीकडेच एका टॉक शोमध्ये दरम्यान नेहाने करीनाला तू प्रेग्नेंट असल्याचे समजताच तुझ्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारापैकी कोणी तुला बाळासाठी नाव सुचवले आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर करीनाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘तुला खरे सांगू का? तैमूरच्या वेळी त्याच्या नावावरुन जे वाद झाले होता ते पाहून मी आणि सैफने अद्याप बाळाचे नाव ठरवलेले नाही. आम्ही नावाचा विचार नंतर करु आणि तुम्हा सर्वांना सरप्राइज देऊ’ असे करीना म्हणाली. 

टॅग्स :करिना कपूर