Join us
Daily Top 2Weekly Top 5

करीना कपूरला आठवला तैमूर सोबतचा 'तो' क्षण, झाली काहीशी इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 11:50 IST

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नुकतीच एका रेडिओ शोमध्ये आली होती. यावेळी तिने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. ति

ठळक मुद्देतैमुर दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही.रणवीर सिंगला तैमूरच्या पापाची भूमिका साकारायची आहे

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नुकतीच एका रेडिओ शोमध्ये आली होती. यावेळी तिने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. तिने तैमूरला पहिल्यांदा हॉस्पिटलमधून घरी आणल्याच्या क्षणाला देखील उजाळा दिला. करिनाने सांगितले की, ''मला आज ही तो क्षण नीट आठवतोय, मी तैमूरला घेऊन घरी जात होते. मी खूप खुश होते आणि घाबरलेले सुद्धा होते. तो पहिल्यांदाच गाडीत बसला होता आणि रस्त्यात एखादा हलकासा झटका जरी लागला तरी मी खूप घाबरुन जायचे. तैमूरसोबतची ती माझी पहिली जर्नी मी कधीच विसरु शकत नाही.''  

  तैमूरच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळे सांगायला नको. सैफ आणि करिनापेक्षाही जास्त त्याचे फॅन्स आता झाले आहेत. सध्या तैमूरही प्रचंड ग्लॅमर अनुभवतो आहे.

तैमुर दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही.  तैमूर अली खान हा आता मीडिया फ्रेंडली झाला आहे. कुठेही पापाराझी त्याचे फोटो काढत असले की तो मस्त पोझेस देतो. तो त्याचे ग्लॅमर एन्जॉय करतो आहे. मध्यंतरी सैफ आणि करिना यांनी त्याला मीडिया आणि त्याच्या फॅन्सपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही.

रणवीर सिंगला तैमूरच्या पापाची भूमिका साकारायची आहे. अजय देवगणने त्याला बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रीय ‘खान’ घोषित केले आहे. तैमूरची आई करिना कपूर हिनेही आपला मुलगा सुपरस्टार असल्याचे म्हटले आहे.  खरे तर तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रीयतेत जराही कमी आलेली नाही. 

टॅग्स :तैमुरकरिना कपूरसैफ अली खान