Join us

जहान कपूरचा अभिनय पाहून कपूर कुटुंबीयांना अश्रू अनावर, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 12:14 IST

रणबीर कपूरचा चुलत भाऊ अर्थात अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

कपूर घराण्यातील रणबीर कपूर हा सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. मात्र आता रणबीर कपूरचा चुलत भाऊ अर्थात अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हंसल मेहताच्या नव्या सिनेमात जहान प्रमुख भूमिका सकारणार आहे. 'फराझ' या सिनेमातून जहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या सिनेमाचे विशेष स्क्रिनिंग कपूर कुटुंबासाठी ठेवण्यात आलं होतं. 

सोशल मीडियावर सुरुवातीच्या रिव्ह्यूससह,'फराझ' हा पाहण्यासारखा चित्रपट आहे. करीना कपूर खान, नीतू कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर, सैफ अली खान, वडील कुणाल कपूर आणि आई शीना सिप्पी जहानला स्क्रिनवर बघून थक्क झाले. ऐवढचं नाही तर जहानचा अभिनय पाहून कपूर कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंद अश्रू आलं. त्यांनी जहानसोबतच अभिनेते परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावलच्या अभिनयाचही कौतुक केलं.    

.2016मध्ये ढाक्याच्या एका कॅफेमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यावर हा सिनेमा आधारीत आहे. आतंकवादी हल्ल्याची ती रात्र सिनेमा दाखवण्यात येणार आहे. आतंकवाद्यांनी अनेक निर्दोष लोकांना मारून टाकलं होतं. तेव्हा लोकांचा जीव वाचवण्यासाठी आतंकवाद्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका तरूण, बेधडक फराज सिनेमात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात जहान कपूर आणि आदित्य रावलसह, जुही बब्बर, आमिर अली, सचिन लालवानी, पलक लालवानी आणि रेशम सहानी यांच्या भूमिका आहेत.हा सिनेमा 3 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :करिना कपूररणबीर कपूरनितू सिंग