Join us

हॉस्पिटलबाहेर दिसली करिना कपूर, फॅन्सची वाढली चिंता video viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 16:02 IST

हॉस्पिटलमध्ये कोणाची भेट घेण्यासाठी आली ? की तिची तब्येत ठिक नाहीय? याबाबत अनेक प्रश्न चाहते सोशल मीडियावर या व्हिडीओ कमेंट करताना दिसत आहेत.

अभिनेत्री करीना कपूर खान  दुसऱ्यांदा आई बनल्यानंतर प्रचंड चर्चेत असते.करीनाचे वडील रणधीर कपूर यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.  दरम्यान, करीना आता मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दिसली. हॉस्पिटला बाहेरचा तिचा  व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर चाहते करिना आणि तिच्या वडिलांच्या तब्येतीबाबत विचारणा करताना दिसत आहे. करीना अखेर हॉस्पिटलमध्ये का गेली ?हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

करिनाचे हॉस्पिटलमध्ये जाण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे करिनाने यावेळी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर पोझ देणं ही टाळले आहे. करिनाला पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. हॉस्पिटलमध्ये  कोणाची भेट घेण्यासाठी आली ? की तिची तब्येत ठिक नाहीय? याबाबत अनेक प्रश्न चाहते सोशल मीडियावर या व्हिडीओ कमेंट करताना दिसत आहेत. करीनाचे वडील रणधीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करीना कपूर खानची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात तिची टेस्ट निगेटीव्ह आली होती.

तसेच फिटनेसवरही ती प्रचंड लक्ष देत आहे. पुन्हा एकदा स्लिम ट्रीम होत पूर्वीसारखा लूक मिळवण्यावर ती मेहनत घेत आहे. 2016मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा प्रेग्नंट होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता. पहिल्या प्रेग्नंसीत घरी बसून आराम करण्यापेक्षा काम करण्यात तिला जास्त आनंद होती. ख-या अर्थाने करिनाने तिची पहिली प्रेग्नंसी ग्लॅमरस केली होती. दुस-या प्रेग्नंसीमध्येही ती अगदी तसेच रुटीन फॉलो करताना दिसली होती.

करीना कपूर खानच्या वर्कफ्रेंडबद्दल बोलताना ती लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्डा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. दुस-या मुलाला जन्म दिल्यानंतर महिनाभरातच ती कामावर परतली होती. करिनाचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रेग्नंसीआधीच करिनाने या सिनेमाचे शूटींग संपवले होते.या चित्रपटाच्या चित्रीकरणकरताना करीनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

टॅग्स :करिना कपूररणधीर कपूर