मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करतात. बोटॉक्स, फिलर्स ही काही नावं आता सर्वांनाच माहित आहेत. कतरिना कैफ, प्रियंका चोप्रासह अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी सर्जरी केली आहे. कोणी ओठांची, कोणी नाकाची सर्जरी करुन घेतली आहे. मात्र या सगळ्यात करीना कपूर (Kareena Kapoor) मात्र नॅचरल लूक फ्लॉन्ट करताना दिसते. नुकतीच ती एका इव्हेंटमध्ये पोहोचली असताना तिने सर्जरीवर भाष्य केलं.
काल बुधवारी करीना कपूरने एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने स्वत:चं आहे ते वय स्वीकारण्याचा सल्ला दिला. तसंच सर्जरी न करता सुंदर त्वचेसाठी काही टीप्स दिल्या. ती म्हणाली, "वय वाढत असताना फीट आणि निरोगी राहण्यासाठी तुमचा आहार व्यवस्थित असावा. वय वाढणं हाच सृष्टीचा नियम आहे. मला असंच राहायला आवडतं. मी याचा स्वीकार करते. यासोबत आहारात तूपाचा समावेश, खिचडी खाणं, मांसपेशींच्या मजबूतीसाठी वेट ट्रेनिंग, हालचाल करणं, सूर्यनमस्कार, त्वचेची काळजी घेणं आणि बोटॉक्सऐवजी स्वत:वर काम करणं या गोष्टी मी करते. तसंच तुमचा आत्मविश्वासच सर्वकाही आहे. प्रत्येक स्त्रीने आत्मविश्वासाने आयुष्य जगलं पाहिजे."
करीना कपूर तिच्या नॅचरल ग्लोमुळे कायम चर्चेत असते. याचंच सीक्रेट तिने सांगितलं आहे. मूळ पंजाबी असेलली करीना तिच्या लूक्समुळे सर्वांना आकर्षित करते. तिची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह देखील तिच्यावरच गेले आहेत.
वर्कफ्रंट
करीना कपूरचे गेल्या वर्षी 'द बर्किंगघम मर्डर्स','क्रू','सिंघम अगेन' या सिनेमांमध्ये दिसली. आता ती मेघना गुलजारच्या आगामी सिनेमात झळकणार आहे.