Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूर इतक्यात करणार नाही बाळाच्या नावाचा खुलासा, जाणून घ्या काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 17:57 IST

बेबो आपल्या दुस-या मुलाचे नाव काय ठेवणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तूर्तास तरी बेबो बाळाच्या नावाचा खुलासा करणार नसल्याचे कळतेय.

ठळक मुद्दे2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता.

सैफ अली खान व करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. करिना कपूरने आज सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला.  दुस-या बाळाच्या जन्माने पतौडी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सैफिनावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दुसरीकडे सोशल मीडियावर सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन, याची चर्चा सुरु झाली आहे. बेबो आपल्या दुस-या मुलाचे नाव काय ठेवणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तूर्तास तरी बेबो बाळाच्या नावाचा खुलासा करणार नसल्याचे कळतेय. यामागे एक कारण आहे.

पहिल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याचे जाहिर करताच करिना व सैफ प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर या नावावरून मोठा वादही झाला होता. यापासून धडा घेत, सैफिना  यावेळी बाळाचे नाव जाहिर करताना सतर्कता बाळगणार असल्याचे समजतेय. ‘व्हॉट वुमन वॉन्ट्स’ या नेहा धूपियाच्या टॉक शोमध्ये खुद्द बेबोने याचे संकेत दिले होते. बाळाचे नाव काय ठेवणार? असे नेहाने विचारले असतात, मी याबद्दल सर्वात शेवटी बोलणार, असे ती म्हणाली होती. अशात करिना कपूर इतक्या लवकरच तिच्या दुसºया बाळाच्या नावाचा खुलासा करणार नाही, असे मानले जातेय.

 

काय होते तैमूर नावावरून वादाचे कारण?2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्याने तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटले जाते. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचे नाव ठेवावे, यावर लोकांचा आक्षेप होता. पण तैमूर या शब्दाचा दुसरा अर्थ शूर, बलवान, प्रसिद्ध राजा असाही होतो.  

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान