Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG- सैफ अली खानवर नाही तर हा अभिनेता होता करिना कपूरचे पहिले क्रश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:11 IST

सध्या करिना तिच्या रेडिओ शो ‘व्हॉट वूमेन वॉन्ट 2 ’च्या सेटवरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

करिना कपूर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या करिना तिच्या रेडिओ शो ‘व्हॉट वूमेन वॉन्ट 2 ’च्या सेटवरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला करिना तिच्या स्टाफमधील एकाला कपमध्ये कॉफी जास्त टाकण्यासाठी बोलते. आणखी एका मुलीला तिला स्ट्रेस न देण्याविषयी सांगते. त्यानंतर कपडे नीट प्रेस न केल्याबद्दल लक्ष्मी नावाच्या एका मुलीवर डाफरताना दिसते. इन्स्टाग्रामवर एक फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओतील बेबोचे नखरे पाहून युजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट देताना दिसत आहेत.

काही महिन्यांपूर्वी करिना एकामध्ये परीक्षकाची भूमिका साकारती होती. याशोच्या सेटवर अँकरने तिला तिच्या पहिल्या क्रशबाबत प्रश्न विचारला होता.  त्यावर उत्तर देताना करीना म्हणाली होती की, माझे पहिलं क्रश राहुल रॉयवर होते. यासाठी तिने त्याचा सिनेमा तब्बल 8 वेळा बघितला होता. महेश भट यांनी दिग्दर्शित केलेला आशिकी सिनेमा 1990 साली रिलीज झाला होता. यात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची मुख्य भूमिका होती.    

करिना कपूर खानने अलीकडेच इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. ती अगोदर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह नव्हती. मात्र, आता ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. तिच्या पोस्टना चाहत्यांचाही प्रतिसाद मिळतो आहे. ती अधून मधून कुटुंबासोबतचे फोटो पोस्ट करत असते.

टॅग्स :करिना कपूर