Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूर रुग्णालयातून घरी पोहोचताच इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह, 'या' व्यक्तीसाठी पहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 16:25 IST

kareena kapoor active on instagram : प्रेग्नेंन्सीच्या काळातही करिना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात होती.

करिना कपूर खानने 21 आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आणि आज तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर करिना कपूर सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाली आहे.

प्रेग्नेंन्सीच्या काळातही करिना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात होती. बाळाला जन्म दिल्यानंतर करिना पुन्हा एकदा इन्स्टावर अॅक्टिव्ह झाली आहे. तिने सैफ अली खानसाठी पहिली पोस्ट केली आहे. सैफचा आगामी सिनेमा 'भूत पोलिस'ची रिलीज डेट जाहिर झाली आहे. करिनानने या सिनेमाच्या रिलीज डेटचे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला 'भूत पोलिस' येत्या 10 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. रमेश तोरानी आणि अक्षय पुरी या सिनेमाचे निर्माते आहेत. पवन कृपलानी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. भूत पोलिस हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे.

रुग्णालयातून बेबो घरी पोहोचताच आपल्या पतीच्या सिनेमाच्या प्रमोशनलाही सुरुवात केली आहे. करिना रुग्णालयातून बाहेर पडताना फोटोग्राफर्सना बाळाचे फोटो काढून देईन असे सगळ्यांना वाटले होते. पण करिना आणि सैफने असे काहीही न करता बाळाला गाडीत बसवले. बाळाचा चेहरा कपड्याने झाकलेला असल्याने कोणालाच सैफ आणि करिनाच्या या चिमुकल्याचा चेहरा दिसला नाही.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान