Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन घरात शिप्ट होताच शेअर केला पहिला फोटो, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 14:10 IST

करिना व सैफने स्वत: त्यांच्या आवडीनुसार हे घर डिझाईन केले आहे. त्यात लायब्ररी, तैंमूर व नवीन बाळासाठी नर्सरी, छोटा स्विमिंगपूल, सुंदर असे टेरेस बनविण्यात आले आहे.

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. सिनेमांस त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. याच कारणामुळे बॉलिवूडची बेबो करिना कपूरही चर्चेत आली आहे. नुकतेच तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. 

बाळाच्या जन्मापूर्वीच सैफ आणि करिना दोघांनी नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहत असलेल्या इमारतीच्या शेजारीच एक घर घेतले आहे. जे घर फॉर्च्युन हाईट्समधील घराच्या दुप्पट आहे. फॉर्च्युन हाईट्सचे शेवटचे दोन मजले हे करीना आणि सैफचे आहेत. करिनाने तिच्या नवीन घराचा फोटो चाहत्यांसह शेअर केला. फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली होती. सध्या तिच्या नवीन घराचीच जास्त चर्चा आहे.

करिना व सैफने स्वत: त्यांच्या आवडीनुसार हे घर डिझाईन केले आहे. त्यात लायब्ररी, तैंमूर व नवीन बाळासाठी नर्सरी, छोटा स्विमिंगपूल, सुंदर असे टेरेस बनविण्यात आले आहे.

 

या घराचे सर्व काम प्रसिद्ध डिझायनर दर्शिनी शाहने केले आहे. घराचे इंटिरेअर इतके  आलिशान आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी खुद्द करिनानेही बरीच मेहनत घेतली आहे. डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी करिनाने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

करीना कपूरच्या फॉर्च्युन हाईट्समधील घरात बऱ्याच आठवणी आहेत. लग्नानंतर करीना याच घरात आली होती. तसेच तैमूरचा जन्म देखील याच घरात झाला आहे. हे घर सोडण्याआधी करीनाने तिच्या खास मैत्रिणी अमृता अरोरा, मलायका अरोरा आणि बहिण करिश्मा कपूर यांच्यासोबत पार्टीदेखील केली. या पार्टीचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर करत त्याला 'फॉर्च्यून मेमरीज' असे कॅप्शन दिले होते.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान