Join us

करीना कपूरचा हा फिटनेस व्हिडीओ पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 16:32 IST

करीना आपलं फिगर मेंटेन ठेवण्यासाठी चांगलीच मेहनत घेतली. आणि ते मेंटेन ठेवण्यासाठी सतत मेहनत घेत आहे.

मुंबई : करीना कपूरचा वीरे दी वेडिंग सिनेमा रिलीज होणार आहे. साईझ झिरो फिगरसाठी प्रसिद्ध असलेली करीना प्रेगनन्सीनंतर कशी दिसेल याची तिच्या चाहत्यांना चांगळीच उत्सुकता लागली होती. पण करीना आपलं फिगर मेंटेन ठेवण्यासाठी चांगलीच मेहनत घेतली. आणि ते मेंटेन ठेवण्यासाठी सतत मेहनत घेत आहे.

प्रेगनन्सीनंतर काही दिवसातच आपलं वाढलेलं वजन आश्चर्यरित्या कमी करुन सर्वानाच धक्का दिला होता. तिच्या या खास फिटनेसचं आणि साईझ झिरोचं गुपित समोर आलं आहे. करीना चांगल्या फिटनेससाठी किती आणि कशी मेहनत घेते याचा व्हिडीओ समोर आला आहे.   

दरम्यान, करीनाचा वीरे दी वेडिंग सिनेमा येत्या 1 जूनला रिलीज होणार आहे. या सिनेमात वेगळ्याच अंदाजात बघायला मिळणार आहे. तिच्यासोबत या सिनेमात सोनम कपूर, स्वरा भास्कर, आणि शिखा तलसानिया याही आहेत. करीना या सिनेमात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :बॉलिवूडहेल्थ टिप्स