Join us

करीना कपूर प्रेग्नेंसीत स्वतःला फिट ठेवण्यासाठी करते हा खास उपाय, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 16:11 IST

करीना कपूर स्वतःला फिट ठेवण्यासाठी करते हा खास उपाय. फोटो शेअर करून चाहत्यांना दिला हा सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यासाठी ती खूप उत्सुक आहे. तर दुसरीकडे करीना कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. नेहमी ती तिच्या लाइफस्टाइलशी निगडीत गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच करीना कपूरने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती योगा करताना दिसते आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, थोडा सा योग..थोडीसी शांती. करीनाच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आणि या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्टायलिश अंदाजात योग करताना दिसते आहे. यासोबतच तिने चाहत्यांना सल्ला दिला आहे की, जर थोडीसी शांतता हवी तर थोडा योग गरजेचा आहे. 

प्रेग्नेंसी दरम्यान करीना स्वतःला फिट आणि ग्लॅमरस ठेवते. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत येत असते.करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती अंग्रेजी मीडियम चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत इरफान खान मुख्य भूमिकेत होता. या सिनेमात करीना पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत होती.

या चित्रपटाआधी करीना गुड न्यूज सिनेमात दिसली होती. यात तिच्यासोबत दलजित दोसांझ, अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते.

लवकरच ती लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :करिना कपूर