Join us
Daily Top 2Weekly Top 5

-तर ‘3 इडियट्स’मध्ये करिना कपूरच्या जागी असती ‘ही’ हिरोईन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 14:42 IST

‘3 इडियट्स’साठीआधी दुस-याच एका अभिनेत्रीचे आॅडिशन घेण्यात आले होते. पण आॅडिशनमध्ये ही अभिनेत्री फेल झाली आणि तिच्याजागी करिना कपूरची वर्णी लागली.

आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटात करिना कपूर लीड भूमिकेत होती. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, या चित्रपटासाठीआधी दुस-याच एका अभिनेत्रीचे आॅडिशन घेण्यात आले होते. पण आॅडिशनमध्ये ही अभिनेत्री फेल झाली आणि तिच्याजागी करिना कपूरची वर्णी लागली. आता आॅडिशनमध्ये फेल झालेली ही अभिनेत्री कोण, याची उत्सुकता तुमच्या मनात निर्माण झाली असेल. तर ती अभिनेत्री आहे, आजची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा. होय, अनुष्का शर्माने राजकुमार हिराणींच्या या चित्रपटासाठी आॅडिशन दिले होते. पण अनुष्का या आॅडिशनमध्ये फेल झाली. या आॅडिशनमध्ये अनुष्काला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा एक डायलॉग म्हणायला होता. अनुष्काने म्हटलाही, पण राजकुमार हिराणींना तो आवडला नाही. अनुष्का या आॅडिशनमध्ये पास झाली असती तर कदाचित ‘3 इडियट्स’मध्ये अनुष्काची वर्णी लागली असती.आमिरसोबत हा तिचा पहिला चित्रपट ठरला असता.  (अर्थात अनुष्का ‘3 इडियट्स’मध्ये काम करू शकली नाही. पण पुढे राज कुमार हिराणींच्या ‘पीके’ आणि ‘संजू’ या दोन चित्रपटांत ती झकळली. यापैकी ‘पीके’मध्ये तिने आमिर खानसोबत स्क्रिन शेअर केली.) शिवाय ‘रब ने बना दे जोडी’ऐवजी ‘3 इडियट्स’ हा अनुष्काचा डेब्यू सिनेमा ठरला असता. एका मुलाखतीत अनुष्काने या आॅडिशनबद्दल सांगितले होते. ‘रब ने बना दी जोडी’मध्ये सिलेक्ट होण्यापूर्वी मी काही चित्रपटाचे आॅडिशन दिले होते. यात ‘3 इडियट्स’चा समावेश होता. पण मी या आॅडिशनमध्ये पास होऊ शकले नाही. पण तरिही मी माझ्यावरचा विश्वास कधीही ढळू दिला नाही आणि आॅडिशन देत राहिले. यानंतर  ‘रब ने बना दी जोडी’साठी माझी निवड झाली, असे अनुष्काने सांगितले होते. बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत काम करणाºया अभिनेत्रींमध्ये अनुष्काचेही नाव आहे. एका मुलाखतीत अनुष्काने

टॅग्स :अनुष्का शर्माकरिना कपूरआमिर खानराजकुमार हिरानी