Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नेंसीमध्ये कामवर परतली करिना कपूर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 18:27 IST

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. करिना कपूरच्या पीआर टीमकडून ही गुडन्यूज सगळ्यांना देण्यात आली. या व्यतिरिक्त, करिना प्रेग्नेंसीदरम्यान कामावर परतली आहे. तिच्या मेकअप आर्टिस्टने एक फोटो शेअर केला आहे, ज्याला खूप पसंती मिळाली आहे. 

 करिनाची मेकअप आर्टिस्टने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले गेले,''मी टीमसोबत परतले आहे, खूप मिस केले. पाच महिन्यानंतर.'' फोटोमध्ये करिना ऑफ-व्हाइट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी करिनाने चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसत नाही, मात्र तिच्या चेहऱ्यावर शूटिंगवर परत येण्याचा आनंद स्पष्ट दिसते आहे. फोटोमध्ये करिनासोबत तिची टीममधले लोकसुद्धा दिसतायेत. करिनाची डिलेव्हरी मार्चमध्ये होऊ शकते.  

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, करीना लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिने करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा 'तख्त'देखील साईन केला आहे. ज्यात तिच्यासोबत अनिल कपूर, विकी कौशल, रणवीर सिंग, आलिया भट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत. 

टॅग्स :करिना कपूर