Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा चली लंडन’मध्ये करण व्होराची एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 20:30 IST

‘कृष्णा चली लंडन’ मालिका प्रसिध्द आहे. आता हे दाम्पत्य लंडनमधील आपल्या जीवनाला प्रारंभ करीत असताना त्यांच्या जीवनात डॉ. वीर याचा प्रवेश होणार आहे.

ठळक मुद्देकृष्णाच्या जीवनात डॉ. वीरचा प्रवेश झाल्यावर तिच्या कसोटी लागणार आहे

कथानकाला अनपेक्षित धक्के देण्याबद्दल आणि राधे व कृष्णाच्या जीवनात नवनव्या व्यक्तींचा प्रवेश करण्याबद्दल ‘कृष्णा चली लंडन’ मालिका प्रसिध्द आहे. आता हे दाम्पत्य लंडनमधील आपल्या जीवनाला प्रारंभ करीत असताना त्यांच्या जीवनात डॉ. वीर याचा प्रवेश होणार आहे. या भूमिकेद्वारे देखणा अभिनेता करण व्होराचा या मालिकेत प्रवेश होत आहे. मालिकेतील आगामी भागांमध्ये कृष्णाच्या जीवनात डॉ. वीरचा प्रवेश झाल्यावर तिच्या कसोटी लागणार आहे. वीर हा डॉक्टर तर आहेच, पण तो कृष्णाचा प्राध्यापकही असून तो कृष्णाला तिच्या मर्यादा ताणण्यास लावतो. त्यामुळे तिच्या डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होण्यात अडचणी निर्माण होतात. या मालिकेत भूमिका साकारण्यस मिळाल्यामुळे आनंदित झालेल्या करणने सांगितले, “डॉ. वीर हा एक तरूण आणि कठोर प्राध्यपक असतो. तसंच तो लंडन मेडिकल कॉलेजमध्ये कार्डिऑलॉजी विभागचा प्रमुखही असतो. त्याने आपली भारतीय मुळे तोडून ब्रिटिशष संस्कृती पूर्णत: स्वीकारलेली असते. मी प्रथमच मालिकेत एका डॉक्टरची भूमिका रंगवीत आहे. त्याच्या व्यक्तिरेखेला असलेल्या विविध छटा आणि त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यामुळे मी या भूमिकेकडे आकर्षित झालो. टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात मी तसा नवखाच असल्याने मला व्यक्तिरेखांबाबत प्रयोग करायला आवडतात आणि कृष्णा चली लंडनसारख्या मालिकेत मला भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा पाहताना खूप मजा येईल, जितकी ती साकारताना मला मजा आली अशी मी आशा करतो.”

इतर अनेक मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका रंगविलेला हा अभिनेता आता या मालिकेत पदार्पण करीत असून त्याची व्यक्तिरेखा पाहणे नक्कीच रंजक ठरेल.

टॅग्स :कृष्णा चली लंडन