Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसौटी जिंदगी की 2 या मालिकेत बजाजच्या भूमिकेत दिसणार नाही करण सिंग ग्रोव्हर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 16:48 IST

कसौटी जिंदगी की २ ही मालिका टिआरपी रेसमध्ये नेहमीच अव्वल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कोमालिका या व्यक्तिरेखेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता मालिकेत कोमोलिकाचा ट्रॅक संपल्यानंतर मि. बजाजचा ट्रॅक येणार आहे.

ठळक मुद्देकरण या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे प्रोडक्शन हाऊसमधील काही लोकांना वाटत आहे. तो एरिका समोर खूपच मोठा वाटेल अशी शंका असल्याने आता नव्या अभिनेत्याचा बजाज या भूमिकेसाठी शोध सुरू आहे.

कसौटी जिंदगी की या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेचा आता दुसरा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कसौटी जिंदगी की २ या मालिकेची सगळीच स्टारकास्ट नवीन असून यात प्रेरणाच्या भूमिकेत एरिका फर्नांडीस, अनुरागच्या भूमिकेत पार्थ सॅमथन तर कोमोलिकाच्या भूमिकेत हिना खान दिसत आहे.

कसौटी जिंदगी की २ ही मालिका टिआरपी रेसमध्ये नेहमीच अव्वल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कोमालिका या व्यक्तिरेखेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता मालिकेत कोमोलिकाचा ट्रॅक संपल्यानंतर मि. बजाजचा ट्रॅक येणार आहे. कसौटी जिंदगी की या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये मि. बजाजची भूमिका साकारणाऱ्या रोनित रॉयने प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. रोनित रॉयला या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ही मालिका संपून इतकी वर्षं झाली असली तरी मि. बजाज ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

हा आयकॉनिक रोल साकारण्यासाठी करण सिंग ग्रोव्हरचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात होते. एवढेच नव्हे तर तो लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची चर्चा होती. पण आता पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, करण या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे प्रोडक्शन हाऊसमधील काही लोकांना वाटत आहे. तो एरिका समोर खूपच मोठा वाटेल अशी शंका असल्याने आता नव्या अभिनेत्याचा बजाज या भूमिकेसाठी शोध सुरू आहे. तसेच करणने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नसून मि.बजाजची मालिकेत एंट्री होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. 

एकता कपूरने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट करून लवकरच मि. बजाजची मालिकेत एंट्री होणार असल्याचे सांगितले आहे. तिने कसौटी जिंदगी की या मालिकेतील रोनित रॉय आणि श्वेता तिवारी यांचा एक फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, मि. बजाज या भूमिकेतून रोनित रॉयला निरोप देण्याची आता वेळ आली आहे आणि नवीन मि.बजाजच्या आम्ही शोधात आहोत... असे लिहिले होते.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2करण सिंग ग्रोव्हर