Join us

करण सिंग ग्रोव्हर व सागरिका घाटगेचे डिजिटल माध्यमात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:00 IST

अभिनेता करण सिंग ग्रोव्‍हर आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनादेखील डिजिटल माध्यमाची भुरळ पडली असून ते दोघे लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे

ठळक मुद्दे'बॉस' ही रहस्‍यमय रोमांचक सीरिज

अभिनेता करण सिंग ग्रोव्‍हर आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनादेखील डिजिटल माध्यमाची भुरळ पडली असून ते दोघे लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. ते दोघे ऑल्‍ट बालाजीची नवीन सीरिज 'बॉस – बाप ऑफ स्‍पेशल सर्विसेस'मध्ये झळकणार आहेत. यात करण केशव पंडितच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सागरिका साक्षी रावतची भूमिका साकारताना दिसणार आहे.

डिजिटल क्षेत्रातील पदार्पणाबाबत बोलताना करण ग्रोव्‍हर म्‍हणाला, 'बालाजी प्रोडक्‍शनसह माझे टेलिव्हिजनवर पदार्पण झाले आहे आणि आता याच प्रोडक्‍शन हाऊससोबत डिजिटल व्‍यासपीठावर देखील पदार्पण होत आहे. माझ्यासह अनेक कलाकारांचे करिअर घडवण्‍यामध्‍ये एकताचा मोलाचा वाटा राहिला आहे. ऑल्‍ट बालाजी हे सर्वोत्‍तम प्रोडक्‍शन हाऊस आहे. ते अगदी बॉससारखे आहे. मालिकेच्‍या नावापासून संकल्‍पनेपर्यंत तसेच अत्‍यंत प्रतिभावान दिग्‍दर्शक अंकुश भट्ट ते गालिबसारखा सर्वोत्‍तम लेखक अशा सर्व उत्‍तमोत्‍तम सहायकांसह स्‍वत: 'बॉस' (एकता) या सिरीजची निर्मिती करत आहे. मी या सीरिजसाठी अत्‍यंत आनंदित किंवा उत्‍सुक आहे.'

'बॉस' ही रहस्‍यमय रोमांचक सीरिज आहे. ही उत्‍तर भारतात राहणाऱ्या एका कावेबाज व्‍यक्‍तीची कथा असून करण सिंग ग्रोव्हरसागरिका घाटगे यांना वेबसीरिजमध्ये काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :करण सिंग ग्रोव्हरसागरिका घाटगे