Join us

कपिल शर्माचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन!, चाहते झाले हैराण, म्हणाले - औषध की जिम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:17 IST

Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे, ज्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे. कपिल शर्मा या व्हिडीओत खूपच बारीक दिसत आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा(Kapil Sharma)चा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे, ज्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे. कपिल शर्मा या व्हिडीओत खूपच बारीक दिसत आहे, त्याला पाहून चाहते हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये तो खूपच स्लिम आणि फिट दिसत आहे. त्याचा नवा लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत, कारण करण जोहरच्या लूकनंतर काही दिवसांनीच हा लूक समोर आला आहे.

कपिल शर्मा नुकताच ९ एप्रिल रोजी मुंबई विमानतळावर पाहायला मिळाला. यावेळी त्याचा लूक पाहून सगळेच हैराण झाले. कपिलचे वजन खूपच कमी झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे चाहते चकित झाले. कपिलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये त्याचा नवीन लूक पाहून अनेक लोक थक्क झालेत. सोशल मीडियावर लोकांना तो कुठे जातोय, हा चमत्कार कसा झाला आणि त्याने इतके वजन कसे घटविले, हे जाणून घ्यायचे आहे. मुंबई एअरपोर्टवर कपिल शर्मा को-ऑर्ड सेटमध्ये पाहायला मिळाला. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियासोशल मीडियावर कपिल शर्माचा व्हिडीओ पाहून खूप प्रतिक्रिया येत आहेत. काहींना आश्चर्य वाटले की हा विनोदी कलाकार ओझेम्पिक सारख्या लोकप्रिय वजन कमी करणाऱ्या औषधांचा वापर करतोय का? एका युजरने लिहिले, 'कपिल शर्माचे वजन खूप कमी झाले आहे', तर दुसऱ्याने लिहिले, 'तो आजारी दिसतोय.' ओझेम्पिकच्या वापरावर शंका घेणारे अनेक होते आणि विचारत होते, ओझेम्पिक की जिम? एका युजरने लिहिले की, तो ओझेम्पिक घेत आहे. एकाने लिहिले: ओझेम्पिकमुळे संपूर्ण बॉलिवूड पातळ झाले आहे.

लॉकडाउनपासून कॉमेडियन फिटनेससाठी गाळतोय घामलॉकडाउनपासून कपिल त्याच्या फिटनेसवर कठोर परिश्रम करत आहे. २०२० मध्ये एका शूटिंग दरम्यान कपिल शर्माने शेअर केले की, त्याने सुमारे ११ किलो वजन कमी केले आहे. 

वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, कपिल लवकरच 'किस किस को प्यार करूं २'मध्ये दिसणार आहे.  नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर भेटीला आले आहे.

टॅग्स :कपिल शर्मा