Join us

... आणि सोनू निगमने कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेककडे मागितले एक करोड रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 08:13 IST

कपिल आणि त्याच्या टीमसोबत सोनू आणि त्याची पत्नी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. तसेच सोनू त्याची प्रसिद्ध गाणी गाऊन उपस्थित लोकांचे मन जिंकणार आहे.

ठळक मुद्देसपना या कार्यक्रमात येणाऱ्या स्पर्धकांची मस्करी करण्यासोबतच त्यांच्याकडून नेहमीच एक करोड रुपये मागत असते. आता तिचा हा डाव सोनू तिच्यावर उलटवणार आहे. सोनू निगमच सपना म्हणजेच कृष्णा अभिषेककडे एक करोड रुपये मागणार आहे.

कपिलचा द कपिल शर्मा शोचा दुसरा भाग प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील टिकून आहे. या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात प्रेक्षकांना सोनू निगम पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात तो पत्नीसोबत हजेरी लावणार आहे. कपिल आणि त्याच्या टीमसोबत सोनू आणि त्याची पत्नी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. तसेच सोनू त्याची प्रसिद्ध गाणी गाऊन उपस्थित लोकांचे मन जिंकणार आहे. 

सोनू निगम त्याच्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. तो लोकांची टर खेचण्याची एक देखील संधी सोडत नाही. त्यामुळे द कपिल शर्मा या कार्यक्रमात देखील सोनू निगम सगळ्यांची टर उडवताना दिसणार आहे. द कपिल शर्मा शो मधील सपना ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेता कृष्णा अभिषेक साकारतो. सपना या कार्यक्रमात येणाऱ्या स्पर्धकांची मस्करी करण्यासोबतच त्यांच्याकडून नेहमीच एक करोड रुपये मागत असते. आता तिचा हा डाव सोनू तिच्यावर उलटवणार आहे. सोनू निगमच सपना म्हणजेच कृष्णा अभिषेककडे एक करोड रुपये मागणार आहे. या कार्यक्रमाचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा प्रोमो प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या प्रोमोमध्ये सोनू सपनाला बोलताना दिसत आहे की, तू या कार्यक्रमाच्या निर्मात्यावर काय जादूटोणा केला आहेस? कधी या कार्यक्रमात तू माणसाच्या भूमिकेत तर कधी स्त्रीच्या भूमिकेत दिसतोस. तू एवढा पैसा कमावत आहेस तर त्यातील एक करोड रुपये मला दे...

सोनूचा हा संवाद ऐकून या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कपिल शर्मा सोबतच सगळ्यांनाच त्यांचे हसू आवरले नाही. द कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, रोचेल राव यांसारखे पहिल्या सिझनमधील कलाकार तर भारती सिंग, कृष्णा अभिषेक यांसारखे नवीन कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत.

टॅग्स :सोनू निगमकपिल शर्मा द कपिल शर्मा शो