Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्मा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या भेटीला, काय म्हणाला? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 23:39 IST

कॉमेडियन कपिल शर्माची सध्या जोरदार चर्चा आहे. कपिलनं नुकतीच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली आहे.

कॉमेडियन कपिल शर्माची सध्या जोरदार चर्चा आहे. कपिलनं नुकतीच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली आहे. कपिलनं स्वत: याचे फोटो देखील सोशल मीडियात शेअर केले आहेत. 'ओडिशाचे मुख्यमंत्री श्री नवीन पटनायक जी यांना भेटून आनंद झाला. अद्भूत आदरातिथ्याबद्दल आणि मला घरी बोलविल्याबद्दल धन्यवाद. तुमचे हृदय तुमच्या राज्यासारखे सुंदर आहे. ओडिशा नेहमी माझ्या हृदयात राहील", असं कपिल शर्मा यानं नवीन पटनायक यांच्या भेटीचा फोटो शेअर करत म्हटलं आहे. 

"तुम्ही तुमच्या चित्रपटांप्रमाणेच मला या सुंदर राज्याची, तिथल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून दिल्याबद्दल नंदिता दास यांचे विशेष आभार", असंही कपिल शर्मानं म्हटलं आहे. कपिलसोबत नंदिता दासही उपस्थित होती. त्यांनीच कपिल शर्मा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. कपिल लवकरच नंदिता दासच्या चित्रपटात दिसणार आहे. कपिलने काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती. या चित्रपटात कपिल डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :कपिल शर्मा ओदिशा