Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्माच्या घरी पत्नी गिन्नीचे झाले बेबी शॉवर, समोर आले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 15:31 IST

कपिल बच्चनने गिन्नीसोबत 12 डिसेंबर, 2018 ला लग्न केले होते.

लवकरच कॉमेडी किंग कपिल शर्माच्या कुटुंबात आता एका ‘तान्हुल्या’बाळाचा लवकरच प्रवेश होणार आहे. ती माहेराला जाण्याआधी परंपरेनुसार तिच्या डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रम पार पडला. या खास कार्यक्रमाला नातेवाईकांसह इंडस्ट्रीतील मित्र मंडळींनीही हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांनी कपिल आणि पत्नी गिन्नीला शुभेच्छा देत खूप सारे गिफ्टही दिलेत. यावेळी गिन्नी वेस्टर्न लूकमध्ये दिसली. तसेच  कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दोघांच्या जीवनात येणा-या बाळाचे आता काऊंट डाऊन सुरू झाले आहे.

विशेष म्हणजे कपिलची इच्छा आहे डिलिव्हरीच्या वेळी गिन्नीला पूर्ण वेळ द्यावा, 11 डिसेंबरपासून 'द कपिल शर्मा शो' मधून घेणार सुट्टी. काही महिन्यांपूर्वी त्याने पत्नी गिन्नी चतरथसोबत वेळ घालवण्यासाठी 'द कपिल शर्मा शो' मधून 10 दिवसांचा ब्रेक घेतला होता. यादरम्यान कपिल गिन्नीसोबत कॅनडाला गेला होता.  न्यू ईयर सेलिब्रेशनसाठीही तो कोणतीही प्रोफेशनल कमिटमेंट घेऊ इच्छित नाही. तो यादरम्यान कोणत्याच प्रकारचे काम करणार नाही. तो पूर्णपणे वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो.

 

तसेच हे वर्ष कपिलसाठी बाळाच्या येण्यामुळे स्पेशल असणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये गिन्नी बाळाला जन्म देणार आहे. कपिलने गिन्नीसोबत 12 डिसेंबर, 2018 ला लग्न केले होते. त्यामुळे 2019 वर्षात चिमुकल्याच्या येण्याने एक वेगळाच उत्साह पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

टॅग्स :कपिल शर्मा