Join us

एका एपिसोडचे ५ कोटी घेतो कपिल शर्मा, संपूर्ण सीझनचं मानधन वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:07 IST

नेटफ्लिक्सवर शो आल्यानंतर कपिल शर्माने किती मानधन घेतलं याचा आकडा ऐकून थक्कच व्हाल

कपिल शर्मा (Kapil Sharma) गेल्या काही वर्षांपासून आघाडीचा कॉमेडियन आहे. आधी त्याचा टीव्हीवरील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' शो तुफान गाजला. अनेक वर्ष हा चालला. कित्येक सेलिब्रिटी, वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज या शोवर येऊन गेले. तर आता त्याचा शो नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नावाने येत आहे. याचा तिसरा सीझन आला आहे. सलमान खान या सीझनचा पहिला गेस्ट होता. दरम्यान नेटफ्लिक्सवर शो आल्यानंतर कपिल शर्माने किती मानधन घेतलं याचा आकडा ऐकून थक्कच व्हाल

मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एका एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये इतकं मानधन घेतो. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सीझनसाठी त्याने प्रत्येक एपिसोडसाठी ५ कोटी घेतले. प्रत्येक सीझनमध्ये १३ एपिसोड्स असतात.  याचा अर्थ तो एका सीझनमधून तब्बल ६५ कोटी कमावतो. तसंच तीनही सीझन मिळून होताच चक्क १९५ कोटी रुपये. वाचून थक्क झालात ना? कपिलचं हेच मानधन आज त्याला सर्वात महागडा कॉमेडियन बनवतं.

कपिल शर्माने त्याच्या करिअरची सुरुवात 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमधून केली. यानंतर अनेक वर्षांनी त्याने स्वत:चा शो काढला. कपिल उत्तम गाणंही गातो. अनेकदा त्याच्या गायनाची झलक त्याने शोमध्येच दाखवली आहे. याशिवाय कपिलने 'किस किस को प्यार करुँ', झ्विगॅटो' या सिनेमांमध्येही काम केलं. आज तो सर्वात लोकप्रिय कॉमेडियन म्हणून ओळखला जातो.

टॅग्स :कपिल शर्मा सेलिब्रिटीनेटफ्लिक्स