Join us
Daily Top 2Weekly Top 5

अब तू देख बेटा तेरा क्या हाल होगा...! कंगनाच्या बहीणीने साधला हृतिक रोशनवर निशाणा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 10:22 IST

होय, कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि हृतिकचा ‘सुपर 30’ हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर आमने-सामने असणार आहेत. या खेळात कोण बाजी मारणार, हा प्रश्न असताना आता कंगनाची बहीण रंगोली हिने हृतिकवर जोरदार निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देअलीकडे ‘मेंटल है क्या’ची २१ जून ही रिलीज डेट बदलून २६ जुलै करण्यात आली. २६ जुलैलाच हृतिकचा ‘सुपर 30’ रिलीज होतोय.

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद बराच जुना आहे. तूर्तास हा वाद पुन्हा उफाळून आलाय आणि याला कारण आहे ते ‘मेंटल है क्या’ आणि ‘सुपर 30’च्या रिलीज डेटचा क्लॅश. होय, कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि हृतिकचा ‘सुपर 30’ हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर आमने-सामने असणार आहेत. या खेळात कोण बाजी मारणार, हा प्रश्न असताना आता कंगनाची बहीण रंगोली हिने हृतिकवर जोरदार निशाणा साधला आहे.रंगोलीने आपल्या सोशल अकाऊंटवर एकापाठोपाठ अनेक ट्वीट  करत, हृतिकवर कंगनाविरोधात निगेटीव्ह पीआर कॅम्पेन चालवण्याचा आरोप केला.

‘जी व्यक्ति रणांगणात लढण्याऐवजी पाठीमागून वार करते, तिच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते. तू आणि तुझा पीआर कंगनाला जितके खाली दाखवण्याचा प्रयत्न करतील, तितकीच ती तुला खाली खेचेल. आत्तापर्यंत ती याबद्दल काहीही विचार करत नव्हती. पण आता तू पाहाच...जादू,’ असे ट्वीट रंगोलीने केले. ‘तू तुझ्या चिल्लर पीआरकडून ट्वीट  करवतोस. ती फक्त एक मुलाखत देते आणि तू चारी मुंड्या चित...’, असेही तिने लिहिले.

ती केवळ इथेच थांबली नाही तर, तिने हृतिकला चक्क धमकीवजा इशारा दिला. ‘बालाजी कंगनाचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस नाही. बालाजीला जेव्हा वाटेल तेव्हा ते चित्रपट रिलीज करतील. पण पप्पू तर पप्पूच असतो. कॉमन सेन्स नाहीच. आता तु पाहाच बेटा, तुझा काय हाल होतो,’ असेही तिने लिहिले.‘कंगनाने एकता कपूरला २६ जुलैला मेंटल है क्या रिलीज न करण्याची विनंती केली. पण एक निर्माता या नात्याने मला माझ्या चित्रपटाची रिलीज डेट ठरवण्याचा अधिकार आहे, असे एकता म्हणाली. मग ती आपल्या लहानपणीच्या मित्राला भेटली आणि मग दोघांनी मिळून हा निर्णय घेतला,’ अशी एक पोस्टही रंगोलीने केली. पुढे जात, ‘यावेळी तू वा तुझ्या पीआरने कंगनावर एकही बालिश हल्ला केला तर ती तुझी संपूर्ण चरबी काढेल. ती सुद्धा एका क्षणात. आता तरी सुधर...’, असेही रंगोलीने लिहिले.अलीकडे ‘मेंटल है क्या’ची २१ जून ही रिलीज डेट बदलून २६ जुलै करण्यात आली. २६ जुलैलाच हृतिकचा ‘सुपर 30’ रिलीज होतोय. एकंदर काय तर बॉक्स आॅफिसवर कंगना विरूद्ध हृतिक हा सामना पक्का आहे. आता यात कोण बाजी मारतो, तेच केवळ बघायचेय.

टॅग्स :कंगना राणौतहृतिक रोशनमेंटल है क्या