Join us

- तर आदित्य चोप्रा सर्जरी स्पेशालिस्ट असता...! आता केआरकेने घेतला ‘यशराज’शी पंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 15:29 IST

आदित्य चोप्राबद्दल केआरकेने असे काही ट्वीट केले की, ते वाचून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. 

ठळक मुद्देकेआरकेचे हे ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होतेय. अद्याप आदित्यने या ट्वीटचे उत्तर दिलेले नाही.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरके आपल्या वादग्रस्त ट्वीटसाठी कायम चर्चेत असतो. बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करणे, हे केआरकेचे आवडते काम. यावरून अनेकदा तो ट्रोलही होतो. पण केआरके कधीच कोणाची पर्वा करत नाही. आता केआरकेने कोणाशी पंगा घ्यावा तर यशराज फिल्म्सचा मालक आदित्य चोप्रासोबत.आदित्य चोप्राबद्दल केआरकेने असे काही ट्वीट केले की, ते वाचून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. 

‘आदित्य चोप्रा निर्माता नसता तर सर्जरी तज्ज्ञ असता, असे यशराजने लॉन्च केलेली एक अभिनेत्री मला म्हणाली. कारण आदित्य प्रत्येक मुलीला कोणती ना कोणती सर्जरी करण्याचा सल्ला देतो. यामुळेच यशराजच्या प्रत्येक हिरोईनने सर्जरी केलेली दिसते,’ असे ट्वीट केआरकेने केले.केआरकेचे हे ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होतेय. अद्याप आदित्यने या ट्वीटचे उत्तर दिलेले नाही.यापूर्वी कमाल खानने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर टीका केली होती.  बळीराजा नसेन तर दगड-माती खाऊन जगणार का?  हात जोडून आपल्या अन्नदाताची माफी मागा. आम्ही शेतकरी होतो, आहोत आणि शेवटपर्यंत शेतकरीच राहू. तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणा किंवा दहशतवादी. पण सोबत लक्षात ठेवा, मत मागायला याल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू, असे ट्वीट केआरकेने केले होते.

ऐकलं का? केआरकेला पुढच्या जन्मात व्हायचंय ‘रवीना टंडन’

सलमान,अक्षय, करणचा मला संपवण्याचा कट..! केआरके वाटतेय जीवाची भीती 

 यापूर्वी त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. ‘ अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी लक्ष्मी बॉम्ब  चित्रपटावर बहिष्कार टाकावा. हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही, असे तो म्हणाला होता.

टॅग्स :कमाल आर खानआदित्य चोप्रा