Join us
Daily Top 2Weekly Top 5

कल्की कोचलीनने र्वाश्रमीचा पती अनुराग कश्यपसोबतच्या नात्याबाबत केला खुलासा, म्हणाली- आम्ही दोघे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 11:55 IST

कल्कीने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन (Kalki Koechlin) आठवतेय का? 'ये जवानी है दिवानी' सिनेमात आदितीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्की सध्या काही धक्कादायक खुलासे केल्याने चर्चेत आहे. 'देव डी', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' अशा अनेक सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप पाडली आहे. मात्र तिच्यासाठी बॉलिवूडमध्ये काम करणं अजिबातच सोपं नव्हतं.अलीकडेच, कल्कीने सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

अलीकडेच एका मुलाखतीत कल्की  पूर्वाश्रमीचा पती अनुराग कश्यपसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला. तिने सांगितले की ते बर्याच काळापासून एकत्र आणि दूर होते, मात्र आता दोघांमध्ये सध्या सर्व काही ठीक चालले आहे आणि दोघांचे कुटुंब एकमेकांचा खूप आदर करत आहेत.

अलीकडेच आलिया कश्यपच्या एंगेजमेंट इव्हेंटमध्ये कल्की आणि अनुराग कश्यप एकत्र दिसले होते. या इव्हेंटमध्ये, कल्की, तिचा पती गाय हर्शबर्ग आणि त्यांची मुलगी सफोसह मुंबईत अनुरागची मुलगी आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर यांच्या एंगेजमेंट पार्टीत सहभागी झाली होती. यानंतर सोशल मीडियावर अनुराग आणि कल्कीविषयी बरीच चर्चा रंगली.

कल्की जोया अख्तर आणि रिमा कागती यांच्या अलिकडेच रिलीज झालेल्या 'मेड इन हेवन 2' या वेबसिरीजमध्ये ती झळकली  आहे. यामध्ये तिच्यासोबत शोभिता धुलीपाला, जिम सरभ, अर्जुन माथुर यांचीही भूमिका आहेत. 

टॅग्स :कल्की कोचलीन