Join us

लग्नाआधीच आई होणार हे कळल्यावर कल्कीच्या कुटुंबीयांची होती अशी रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 17:30 IST

कल्की कोच्लिनने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुलीला जन्म दिला आहे.

कल्की कोच्लिनने गेल्या वर्षी  फेब्रुवारी महिन्यात मुलीला जन्म दिला आहे. एका इमोशनल पोस्टद्वारे कल्कीने आपल्या चाहत्यांसोबत ही गुडन्युज शेअर केली होती.  कल्की व हर्शबर्ग यांनी अद्याप लग्न केलेले नाही. लग्नाआधीच दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.

 'करीना कपूर खानच्या व्हॉट व्हुमन वॉन्ट' या शोमध्ये ती आली होती. यावेळी कल्कीने तिच्या प्रेग्नेंसीबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. याशिवाय तिच्या प्रेग्नेंसीवर कुटुबीयांची काय रिअॅक्शन होती हेही तिने सांगितले.   

कल्की म्हणाली, माझ्या नशिबाने माझे कुटुंब पारंपारिक विचारसरणीचे नाहीय. माझी आई म्हणाली होती की,पुढच्या वेळी तू लग्न करशील तेव्हा ते आयुष्यभरासाठी आहे याची खात्री करुन घे. असे ती यासाठी म्हणाली कारण माझा एक घटस्फोट झाला आहे. त्यामुळे तिला माझ्या लग्नाची घाई नव्हती.  2009 मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला.

टॅग्स :कल्की कोचलीन