Join us
Daily Top 2Weekly Top 5

कालीन भैयाऐवजी दुसरी कोणती भूमिका करायला आवडली असती? पंकज त्रिपाठी म्हणाला....

By अमित इंगोले | Updated: October 27, 2020 12:27 IST

कालीन भैयाच्या भूमिकेऐवजी दुसरी भूमिका निवडण्याचा पर्याय असता तर कोणती भूमिका निवडली असती? यावर पंकज त्रिपाठीने उत्तर दिलं.

अभिनेता पंकज त्रिपाठीने पुन्हा एकदा 'मिर्झापूर २'मधील कालीन भैयाच्या भूमिकेतून सर्वांना प्रभावित केलंय. मिर्झापूर २ मधील कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठीने सीरीजमध्ये दुसरी कोणती भूमिका साकारायला आवडली असती असं विचारलं गेलं. यावर पंकज त्रिपाठीने सांगितलं की, त्याला शक्य झालं असतं तर त्याने रसिका दुग्गलची भूमिका साकारली असती.

त्यांची ऑन-स्क्रीन पत्नी 'बीना त्रिपाठी'च्या भूमिकेबाबत पंकज त्रिपाठी म्हणाला की, 'मला बीना त्रिपाठीची भूमिका फार इंटरेस्टींग वाटते. जर माझ्याकडे कालीन भैया ऐवजी दुसरी कोणती भूमिका निवडण्याचा पर्याय असता तर निश्चितपणे बीना त्रिपाठीची भूमिका साकारली असती. कारण या भूमिकेत एक रहस्य आहे आणि रसिका दुग्गलसारख्या शानदार अभिनेत्री ही भूमिका जोरदार साकारली आहे'. ('मिर्झापूर २' मध्ये मुन्ना त्रिपाठीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली ही अभिनेत्री, वाचा कोण आहे ती?)

'मिर्झापूर २'मध्ये पंकज त्रिपाठीसोबतच अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, हर्षिता  शेखर गौड, अमित सियाल, अंजुम शर्मा, शीबा चड्ढा, मनु ऋषी चड्ढा आणि राजेश तेलंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.('मिर्झापूर २'वर भडकल्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल, 'या' कारणाने केली बॅनची मागणी)

वेबसीरीजचं निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल मीडिया अ‍ॅन्ड एन्टरटेन्मेंट बॅनरखाली करण्यात आली आहे. तर वेबसीरीजचं दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि मीहिर देसाई यांनी केलंय. आनंदाची बाब म्हणजे मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनही काम सुरू झालं आहे. त्यामुळे या सीरीजच्या फॅन्समध्ये उत्सुकता वाढली आहे. ('मिर्झापूर'च्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, तिसऱ्या सीझनचीही सुरू आहे तयारी!)

टॅग्स :पंकज त्रिपाठीमिर्झापूर वेबसीरिज