Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कलंक'च्या प्रदर्शनापूर्वीच वरूणने कियारासह केला हा कारनामा, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 11:14 IST

सिनेमात आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितही झळकणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

प्रत्येक सिनेमासाठी वरुण बरीच मेहनत घेतो. आगामी 'कलंक' सिनेमासाठी देखील तो अशीच मेहनत घेताना दिसला होता. कलंकमध्येवरूण धवन आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील 'फर्स्ट क्लास' हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे रसिकांच्या इतके पसंतीस पात्र ठरले की, सध्या लोकांच्या ओठांवर हेच गाणे रूळत आहे. आत्तापर्यंत ‘कलंक’ची तीन गाणी रिलीज झाले आहेत. या तिन्ही गाण्यांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सिनेमाच्या प्रमोशनचा भाग म्हणून कियाराने सोशल मीडियावर वरूणसह आणखीन एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

 

या व्हिडीओलाही रसिकांनी भरघोस पसंती दिर्शवली आहे. दोघेही या व्हिडीओत 'सुन साथिया' या गाण्यावर डान्स करताना दिसतायेत. या गाण्यातील वरुणची कियारासह असलेली केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे. विशेष म्हणजे एका पुरस्कार सोहळ्यात वरूण आणि कियारा या गाण्यावर परफॉर्म करणार आहेत. त्यासाठी हे दोघे सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'कलंक' हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. सिनेमात आलिया  भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितही झळकणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

सिनेमात वरूण लोहारची भूमिका साकारणार आहे. त्याचे दुकान लाहोर मार्केटमध्ये असते. ते हिरा मंडीच्या नावाने प्रसिद्ध असते. वरुणच्या पात्रानुसार त्याचा फिटनेस प्रशिक्षक प्रशांत सावंतने त्याच्याकडून कठीण वर्कआउट करून घेतले. या भूमिकेसाठी वरुणचा लूक गल्लीच्या मुलाप्रमाणे  करण्याचे प्रशांत यांना सांगण्यात आले हाेते.

 

लोहाराचे शारीरिक काम जास्त असते त्यामुळे त्याचे वजन वाढवल्याचेही त्यांनी सांगितलं. शिवाय वरुणनेदेखील यासाठी बराच घाम गाळला आहे. खाण्या पिण्याची वेळ पाळण्याचा सल्लाही वरुणला देण्यात आला होता. त्यामुळे व्यायामाने त्याने शरीर पिळदार बनवले.  वरुणची बॉडी आधीच पिळदार होती. त्यात त्याला जाड दिसायचे असल्याने त्याच्या छाती, कमर आणि दंडावर जास्त मेहनत घेतल्याचे फिटनेस ट्रेनर  प्रशांतने सांगितलं.  

टॅग्स :वरूण धवनकलंकआलिया भटमाधुरी दिक्षित